शेतकरी गटाला अनुदान देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:27 AM2021-06-29T04:27:48+5:302021-06-29T04:27:48+5:30
--------------- मोहरी येथे स्वच्छतेबाबत जनजागृती वाशिम मोहरी : ग्रामपंचायतीकडून कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, याअंतर्गत ...
---------------
मोहरी येथे स्वच्छतेबाबत जनजागृती
वाशिम मोहरी : ग्रामपंचायतीकडून कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, याअंतर्गत सोमवारी गावात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.
---------
पपई पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव!
वाशिम : पारंपरिक पिके डावलून शेतकऱ्यांनी पर्यायी पीकपद्धती अंगिकारून पपई उत्पादनाकडे लक्ष केंद्रित केले; मात्र या पिकावरही सद्यस्थितीत बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून झाडांची वाढ खुंटल्याने बांबर्डा परिसरातील पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
-------------
आसेगावात जोरदार पाऊस
वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव येथे सोमवारी २८ जून रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला. यामुळे शेतीपिकांचे कुठलेही विशेष नुकसान झाले नाही; मात्र टिनपत्रे उडण्यासह झाडे उन्मळून पडणे आणि वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले.
------------
आशा, गटप्रवर्तकांच्या मागण्या प्रलंबित !
वाशिम : आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या दरमहा मानधनात वाढ करावी, यासह इतर मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी आशा सेविकांकडून सोमवारी प्रशासनाकडे करण्यात आली.
--------------
गर्दी टाळण्याचे गावकऱ्यांना आवाहन
वाशिम : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी व्हायला नको, ही बाब लक्षात घेऊन गावकऱ्यांनी गावात होणारी गर्दी टाळावी, असे आवाहन आसेगाव ग्रामपंचायतीने सोमवारी ग्रामस्थांना केले.
-----------
रस्ता कामावर दिशादर्शक फलकाचा अभाव
वाशिम : कारंजा-मानोरा या रस्त्याच्या अद्ययावतीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे रस्ता विविध ठिकाणी खोदून ठेवण्यात आला असून दिशादर्शक फलक नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे संबंधित प्रशासन व कंत्राटदाराने लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.