पूर्णा-पाटणा रेल्वे अमरावतीपर्यंत नेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:41 AM2021-03-31T04:41:45+5:302021-03-31T04:41:45+5:30

पूर्णा रेल्वे स्टेशनवर पाच दिवस थांबणारी पूर्णा-पटना ही एक्स्प्रेस रेल्वेगाडी अमरावतीपर्यंत नेण्यात यावी तसेच सदर एक्स्प्रेस रेल्वेगाडी अमरावती-तिरुपती किंवा ...

Demand to take Purna-Patna railway to Amravati | पूर्णा-पाटणा रेल्वे अमरावतीपर्यंत नेण्याची मागणी

पूर्णा-पाटणा रेल्वे अमरावतीपर्यंत नेण्याची मागणी

Next

पूर्णा रेल्वे स्टेशनवर पाच दिवस थांबणारी पूर्णा-पटना ही एक्स्प्रेस रेल्वेगाडी अमरावतीपर्यंत नेण्यात यावी तसेच सदर एक्स्प्रेस रेल्वेगाडी अमरावती-तिरुपती किंवा अमरावती व्हाया पूर्णा, लातूरमार्गे मुंबई सोडण्यात यावी अशी मागणी वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना एका पत्राव्दारे केली.

खासदार गवळी यांनी गुरुवारी केंद्रीय रेल्वेमंत्री गोयल यांना पत्र दिले असून, या पत्रामध्ये पूर्णा - पटना १७३६०९ व १७६१० ही रेल्वे पूर्णा रेल्वेस्टेशनवर तब्बल पाच दिवस उभी राहत आहे.ही रेल्वेगाडी पूर्णा स्टेशनवर उभी न ठेवता ही रेल्वे अमरावतीपर्यंत सोडण्यात यावी असे नमूद केले आहे.अमरावती येथे पोहोचल्यानंतर पूर्णा- पटना ही गाडी अमरावतीवरुन अमरावती-तिरुपतीसाठी सोडावी किंवा अमरावती-मुंबई व्हाया पूर्णा लातूर मार्गे सुरु करावी. ज्यामुळे अमरावती,अकोला,

वाशिम व हिंगोली जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल असे खासदार गवळी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Web Title: Demand to take Purna-Patna railway to Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.