गौण खनिज उत्खनन थांबवण्यासाठी तहसिलदारांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 04:07 PM2020-08-23T16:07:11+5:302020-08-23T16:07:42+5:30
मागील एक महिन्यापासून टेकडी परिसरात खोदकाम सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जऊळका रेल्वे (वाशिम) : मुंबई ते नागपूर या महामार्गावरील खिर्डा येथे प.पु. काशिनाथ बाबा यांच्या समाधी मंदिर व संस्थानच्या शेतालगत गौण खनिज उत्खनन सुरू असल्याने संस्थानला धोका निर्माण झाला. या पृष्ठभूमीवर गौण खनिज उत्खनन थांबविण्याची मागणी प.पु. काशिनाथ बाबा भक्त मंडळी, विश्वस्त समिती व गावकºयांनी मालेगाव तहसिलदारांसह जिल्हाधिकाºयांकडे २१ आॅगस्ट रोजी निवेदनाद्वारे केली.
निवेदनानुसार, खिर्डा येथे प. पू . काशिनाथ बाबा यांचे समाधी मंदिर हे डव्हा शिवाराच्या हद्दीतील गट नंबर ३ मध्ये बांधलेले आहे. समाधी मंदिर हे उंच टेकडीवर असुन अतिशय निसर्गरम्य वातावरण व परिसरात आहे. या संस्थानच्या मालकीच्या शेतजमिनीची हद्द ही गौण खनिज खोदकाम करणाºया शेतमालकाच्या जमिनीला लागून आहे. टेकडीनजीक गौण खनिजाचे खोदकाम सुरू असून, आणखी खोदकाम केले तर समाधी मंदिराचा परिसर खचून पडेल व समाधी मंदिराला धोका निर्माण होईल, अशी भीती विश्वस्त समितीने निवेदनाद्वारे व्यक्त केली. मागील एक महिन्यापासून टेकडी परिसरात खोदकाम सुरू आहे. यापूर्वीही सन २०१२-१३ मध्ये खोदकाम केले असला, त्यावर संस्थानच्या विश्वस्तांनी मनाई केली होती व तत्कालीन उपविभागीय अधिकाºयांनी खोदकाम थांबविले होते. यावर्षी पुन्हा खोदकाम सुरू करण्यात आले. हे खोदकाम थांबविण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर संतोष पवार, अरुण गीद, नितीन गिद, मोतीराम गिद, रामचंद्र गिद, नितीन शिंदे यांच्यासह विश्वस्त समिती व गावकºयांच्या स्वाक्षरी आहेत.