१८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:43 AM2021-05-27T04:43:44+5:302021-05-27T04:43:44+5:30
लसींचा पुरेसा साठा शिल्लक नसल्याचे कारण समोर करून प्रशासनाने साधारणत: ६ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण ...
लसींचा पुरेसा साठा शिल्लक नसल्याचे कारण समोर करून प्रशासनाने साधारणत: ६ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण बंद करण्याचे निर्देश दिले. तथापि, लसीकरणानंतर कोरोनाचा धोका कमी होतो. त्यामुळे युवा वर्ग लसीकरण घेण्यासाठी तयार आहेत. अनेक युवकांनी त्यापूर्वी रक्तदानही केले आहे. यामुळे ज्यांना रक्ताची गरज भासणार आहे, त्यांची सोय झाली आहे. दुसरीकडे ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांचे लसीकरणही पूर्ण होत आले आहे. या पार्श्वभूमीवर आता १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ करावा, अशी मागणी नीरज चौधरी यांनी केली. लसीकरण केंद्रांवर कुठलाही गोंधळ होणार नाही, याची स्वत: युवा सेना दक्षता घेईल, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.