मालेगाव तालुका पाणीटंचाई निवारणासाठी ९५ लाखांचे अंदाजपत्रक सादर

By admin | Published: December 18, 2014 01:09 AM2014-12-18T01:09:28+5:302014-12-18T01:09:28+5:30

पाणीटंचाई आढावा बैठक : पाणीटंचाईवर झाली सविस्तर चर्चा

Demanding the budget of Rs.55 lakh for Malegaon taluka's shortage of water shortage | मालेगाव तालुका पाणीटंचाई निवारणासाठी ९५ लाखांचे अंदाजपत्रक सादर

मालेगाव तालुका पाणीटंचाई निवारणासाठी ९५ लाखांचे अंदाजपत्रक सादर

Next

मालेगाव (वाशिम) : जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेवरून मालेगाव येथे तालुक्यातील पंचायत समितीमध्ये पाणीटंचाईसाठी आढावा बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत ९५ लाखांच्या प्रस्तावित उपयोजना व अंदाजपत्रक जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आल्या आहे. यावेळी आमदार अमित झनक, गटविकास अधिकारी संदीप पवार, तहसीलदार तसेच तालुक्यातील पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच यांची उपस्थिती होती. यावेळी तालुक्यातील पाणीटंचाईवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे एकूण ९५ लाख ४ हजारांचा कृती आराखडा तयार करून त्याचे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आले आहे. त्यामध्ये जानेवारी २0१५ ते जून २0१५ या काळात ३८ गावात ७७ नवीन हातपंप लावण्यात येणार आहेत. त्यासाठी ३,५१,000 रु. खर्च अपेक्षित आहेत. नवीन हातपंप करंजी, हनवतखेडा, गणेशपूर, वाडीरामराव, खंडाळा शिंदे, उमरवाडी, मैराळडोह, पा. धनकुटे, भौरद, शेलगाव, दापुरी कालवे, शेलगाव, मसला, साक्रापूर, चिवरा, अमाना स्टे. रिधोरा, जऊळका, ब्राह्मणवाडा, बोराळा, बोर्डी, कोल्ही, कळंबेश्‍वर, शिरसाळा, सुकांडा, एरंडा, पांगरी कुटे, दुबळवेल, झोडगा, वाघळुद, सोमठाणा, वाकद, कुरळा, मालेगाव, मेडशी, ताकतोडा, रामनगर, जोडगव्हाण या ठिकाणी नवीन हातपंप देण्यात येणार आहेत. हातपंप दुरुस्ती ७५ गावात २00 ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यासाठी १0 लक्ष रुपये खर्च येणार आहे. तर बोराळा जहागीर येथील नळ योजना दुरुस्ती करण्यात येणार आहे.

Web Title: Demanding the budget of Rs.55 lakh for Malegaon taluka's shortage of water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.