कृषिदूतांकडून कलम बांधणीचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:48 AM2021-08-18T04:48:02+5:302021-08-18T04:48:02+5:30
कृषी महाविद्यालय आमखेडाच्या वतीने कृषिदूत अभिषेक पतंगे, गणेश धनगर, शुभम काळे, विशाल खोलगडे व विशाल मानवतकर या सातव्या सत्रातील ...
कृषी महाविद्यालय आमखेडाच्या वतीने कृषिदूत अभिषेक पतंगे, गणेश धनगर, शुभम काळे, विशाल खोलगडे व विशाल मानवतकर या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमानुसार १३ ऑगष्ट रोजी तालुक्यातील ग्राम मसला येथे शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी कृषिदूतांनी शेतकऱ्यांना कलम बांधणीच्या पद्धतीसह कोणकोणत्या झाडांना ही पद्धत उपयुक्त ठरते, कलम बांधताना कोणती काळजी घ्यावी, त्या झाडाचे कसे संरक्षण करावे, याबाबत मार्गदर्शन करतानाच कलम बांधणीचे फायदे सांगितले. यावेळी शेतकरी सुनील जोगदंड, सुनील ठाकूर, महादेव करवते, पांडुरंग धनगर, आकाश धनगर आदींची उपस्थिती होती. यासाठी कृषिदूतांना कृषी महाविद्यालयाचे प्रा. बी. एम. खरात, प्राचार्य डॉ. जी. एच. वसू, प्रा. प्रदीप निचळ, कार्यक्रम समन्वयक प्रा. समाधान कव्हर, कार्यक्रम अधिकारी, प्रा. शशिकांत वाकुडकर यांचे मार्गदर्शन लाभले.