कळंबा महाली येथे हायब्रिड नेपीअर चाऱ्याचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:27 AM2021-07-04T04:27:30+5:302021-07-04T04:27:30+5:30
या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर.एल. काळे, पशुविज्ञान शाखेचे कार्यक्रम सहायक डॉ. डी.एल. रामटेके, ...
या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर.एल. काळे, पशुविज्ञान शाखेचे कार्यक्रम सहायक डॉ. डी.एल. रामटेके, प्रगतिशील शेतकरी सदाशिव जाधव व गावातील पशुपालक उपस्थित होते. डॉ. आर.एल. काळे यांनी जनावरांच्या आहारात हिरव्या चा-याचे महत्त्व सांगून शेतक-यांनी आपल्या जनावरांसाठी दूध उत्पादनासाठी सीओ-५ चारा लागवड करून त्याचा वापर पशुआहारात करण्याची विनंती केली. या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्रात सुरू असलेल्या उपक्रमांमध्ये मुरघास, आझोला, गांडूळ खतनिर्मिती व व्हर्मिवॉश उत्पादनाची माहिती देऊन या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन पशुखाद्यावर व शेतीवरील होणारा खर्च कमी करून उत्पन्नात वाढ करावी व कृषी विज्ञान केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले. पशुविज्ञान शाखेचे डॉ. डी.एल. रामटेके यांनी हायब्रिड नेपीअर या गवताविषयीची संपूर्ण माहिती दिली. यात लागवड तंत्रज्ञान, कापणी, गवताचे आहारातील प्रमाण व पद्धत याविषयी सखोल माहिती सांगून दूध व्यवसायामध्ये उत्तम वाढ होण्याच्या दृष्टीने हे गवत अत्यंत फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.
-----------
शेतक-यांना गवताच्या थोंबांचे वाटप
कृषी विज्ञान केंद्राकडून आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या कळंबा महाली व पार्डी टकमोर या गावांतील पशुपालक शेतक-यांना गवताचे थोंबवाटप करण्यात आले. दरम्यान, सदाशिव जाधव यांनी कृषी विज्ञान केंद्राद्वारे राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम शेतक-यांच्या कसे फायदेशीर ठरत आहे, हे प्रत्यक्ष भेटीदरम्यान दाखविले. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.