मातीच्या नमुन्याबाबत कृषिकन्यांचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:47 AM2021-08-12T04:47:17+5:302021-08-12T04:47:17+5:30

माती घेताना व्ही आकाराचा खड्डा खोदावा व १५ सेंटिमीटर खोदावा व त्या कड्याच्या एका बाजूची माती घ्यावी प्रत्येक भागातून ...

Demonstration of Krishikanya to farmers regarding soil sampling | मातीच्या नमुन्याबाबत कृषिकन्यांचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक

मातीच्या नमुन्याबाबत कृषिकन्यांचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक

Next

माती घेताना व्ही आकाराचा खड्डा खोदावा व १५ सेंटिमीटर खोदावा व त्या कड्याच्या एका बाजूची माती घ्यावी प्रत्येक भागातून सुमारे पंधरा ठिकाणच्या मातीचे नमुने घ्यावे व ती स्वच्छ करावी, त्यातील काडी-कचरा काढून घ्यावा व माती एकाच स्वच्छ पोत्यात भरावी. या सर्व मातीचे सारखे चार भाग करून समोरासमोरचे दोन भाग एकत्र चांगले मिसळून असे करत अर्धा किलो माती घ्यावी आणि ती माती कापडी पिशवीमध्ये माहितीसह प्रयोगशाळेत पाठवावी. या सर्व पद्धतीचे प्रात्यक्षिक ही करून दाखवले. यावेळी शेतामध्ये शेतकरी भास्कर भोयर, देवराव ठाकरे, किसन कड कांता कड, माला गावंडे, आदी उपस्थित होते. या प्रात्यक्षिकासाठी महाविद्यालयातील कार्यक्रम अधिकारी प्राचार्य शशिकांत वाकुडकर, प्राचार्य डी. टी. बोरकर, प्राचार्य एस. टी. जाधव, इतर प्राध्यापक वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Demonstration of Krishikanya to farmers regarding soil sampling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.