पाेहरादेवीत संजय राठाेड यांच्या समर्थकांचे शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:42 AM2021-02-24T04:42:52+5:302021-02-24T04:42:52+5:30

पाेहरादेवी येथे सकाळी ११ वाजता ना. संजय राठाेड येणार हाेते. त्यामुळे सकाळपासूनच या रस्त्यावर समर्थकांची वर्दळ हाेती. काेराेना ...

Demonstration of Sanjay Rathore's supporters in Paharadevi | पाेहरादेवीत संजय राठाेड यांच्या समर्थकांचे शक्तिप्रदर्शन

पाेहरादेवीत संजय राठाेड यांच्या समर्थकांचे शक्तिप्रदर्शन

googlenewsNext

पाेहरादेवी येथे सकाळी ११ वाजता ना. संजय राठाेड येणार हाेते. त्यामुळे सकाळपासूनच या रस्त्यावर समर्थकांची वर्दळ हाेती. काेराेना संसर्ग पाहता पाेलिसांनी अनेक समर्थकांना वाटेतच राेखले. तरी सुध्दा माेठया प्रमाणत गर्दी झाल्याचे दिसून आले. दिग्रस येथील रेस्ट हाऊसमधून ते १२.१५ मिनिटांनी ते दिग्रस येेथून पाेहरादेवीकरिता निघाले. १२ वाजून ४० मिनिटांनी ते पाेहरादेवीत पाेहचल्याबराेबर समर्थकांनी त्यांना गराडा घातला. यावेळी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पाेलिसांनी साैम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर ते मंदिरात जाऊन देवीदेवतांचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणाबाबत थाेडक्यात व कमी शब्दात आपले मत व्यक्त केले. यावेळी मात्र समर्थकांनी एकच गाेंधळ घातल्याचे दिसून आले. समर्थकांनी पाेहरादेवीतील प्रत्येक चाैकामध्ये घाेषणाबाजी केली. समर्थकांमध्ये महिलांचा सुध्दा माेठा सहभाग दिसून आला. यावेळी राठाेड यांनी आपले म्हणणे मांडून पत्रकार परिषद आटाेपती घेतली. यावेळी पाेहरादेवी येथील महंतांसह विश्वस्ताची उपस्थिती हाेती.

................

राठाेड यांचा दिग्रस ते पाेहरादेवी दिनक्रम

पाेहरादेवी येथे २३ फेब्रवारी राेजी सकाळी ११ वाजता येऊन पूजा चव्हाण प्रकरणी खुलासा करणारे ना. संजय राठाेड दिग्रस येथून १२.१५ वाजता निघालेत. १२ वाजून ४० मिनिटाने पाेहरादेवीत पाेहचल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम मंदिरात पायी जात जगदंबा माता मंदिरात सपत्नीक दर्शन घेतले. त्यानंतर सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर आयाेजित हाेम हवन कार्यक्रमात महंत जितु महाराज, महंत कबिरदास , बाबुसिंग महाराज, संजय महाराजासह आदिंच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. त्यानंतर रामराव महाराज मठामध्ये जाऊन रामराव महाराज समाधीचे दर्शन घेऊन पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर धामणगाव येथे जात असतांना मानाेरा येथील शिवाजी चाैकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन धामणगावकडे रवाना झालेत.

Web Title: Demonstration of Sanjay Rathore's supporters in Paharadevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.