हत्याकांडाचा निषेध
By admin | Published: October 29, 2014 01:30 AM2014-10-29T01:30:51+5:302014-10-29T01:30:51+5:30
दलित हत्याकांडातील आरोपींवर कडक कारवाईची मागणी.
वाशिम : जवखेड (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) येथे झालेल्या दलित हत्याकांडातील आरोपींवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)तर्फे जिल्हाधिकारी कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. पुरोगामी महाराष्ट्रात दलितांच्या हत्याकांडाचे सत्रच सुरू आहे. खैरलांजी ते खर्डामध्ये झालेल्या हत्याकांडामुळे दलितांचे अश्रू वाळण्यापूर्वीच अहमदनगर जिल्ह्यात नवे हत्याकांड निर्माण झाले. अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे खालसा या गावात मानवतेला काळिमा फासणारे तिहेरी दलित हत्याकांड घडले. या घटनेला आठ दिवस उलटले तरी आरोपी अद्याप मोकाट आहेत. हत्याकांडातील दोषींना तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अहमदनगर जिल्हा हा ह्यदलित अत्याचारग्रस्त जिल्हाह्ण म्हणून घोषित करावा, पीडित कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची मदत सरकारने द्यावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.