केरळपूरग्रस्तांच्या मदतीसाठी वेतनातून रक्कम कपात करण्यास मानोरा तालुक्यातील शिक्षकांचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 04:47 PM2018-09-02T16:47:56+5:302018-09-02T16:48:48+5:30
मानोरा (वाशिम) : केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून एक दिवसाचे वेतन कपात करण्यास मानोरा तालुक्यातील नवीन अंशदायी पेन्शन कर्मचारी संघटनेच्या शिक्षकांनी नकार दर्शविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) : केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून एक दिवसाचे वेतन कपात करण्यास मानोरा तालुक्यातील नवीन अंशदायी पेन्शन कर्मचारी संघटनेच्या शिक्षकांनी नकार दर्शविला आहे. एका दिवसाचे वेतन मदत निधीसाठी कपात करू नये, असे पत्र शिक्षकांनी गटशिक्षणाधिकाºयांना शनिवारी दिले. आम्ही स्वत: केरळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एक दिवसाच्या वेतनाची रक्कम जमा करू, असा निर्धार या शिक्षक संघटनेने केला.
२००५ नंतर राज्य शासनाच्या सेवेत रुजू झालेल्या कर्मचाºयांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही. त्याऐवजी नवीन अंशदायी पेन्शन योजना (डीसीपीएस) लादण्यात आली आहे. ही योजना रद्द करून जुनीच पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी गेल्या पाच वर्षांपासून रस्त्यावर उतरून संघर्ष करीत असल्याचे नमूद करीत या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नवीन अंशदायी पेन्शन कर्मचारी संघटनेच्या शिक्षकांनी केला. ‘डीसीपीएस’मुळे कर्मचाºयांचे व त्यांच्या कुटुंबियांचे भवितव्य अंधकारमय होत आहे, असे या शिक्षकांनी निवेदनात नमूद केले.
२००५ नंतर राज्य शासनाच्या सेवेत नोकरी करणाºया जवळपास तीन हजार कर्मचाºयांचा मृत्यू झाला आहे. मात्र जुनी पेन्शन योजना लागू नसल्याने या कर्मचाºयांच्या कुटुंबियांपुढे आज जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्याकडे राज्य शासन सहानुभूतीने पाहावयास तयार नाही, असा आरोप करीत या मागणीचाही शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी शिक्षकांनी केली. जुनी पेन्शन योजना लागू न केल्यामुळे राज्य शासनाकडे मदत निधी न देता थेट केरळच्या मुख्यमंत्री सहायता निधीत रक्कम जमा करणार असल्याचे शिक्षकांनी निवेदनात नमूद केले. निवेदन देतेवेळी बालाजी मोटे, गोपाल लोखंडे, निलेश कानडे, हरिदास मते, रवि ठाकरे, बालाजी फताटे, गोविंद पोतदार, निलेश मोरे, अर्जून लोंढे, धीरज आडे, प्रमोद पवार , संदिप सावळे, चंद्रमणी इंगोले, सचिन सवडतकर, गणेश गवई, अमोल ठोंबरे, मिलींद दुथडे, दत्ता ओवांडकर, जयप्रकाश गायकवाड, समीर देशमुख यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती.