विभाग प्रमुखांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 02:04 AM2017-08-12T02:04:31+5:302017-08-12T02:04:39+5:30

वाशिम : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय  वाशिम व यशदा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ऑगस्ट रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आपत्ती व्यवस्था पनासंदर्भात विभाग प्रमुखांचे एक दिवशीय प्रशिक्षण घेण्यात आले.

Department of Disaster Management Lessons! | विभाग प्रमुखांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे!

विभाग प्रमुखांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे!

Next
ठळक मुद्देआपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आपत्तीनिहाय आराखडा तयार करण्याची सूचना 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय  वाशिम व यशदा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ऑगस्ट रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आपत्ती व्यवस्था पनासंदर्भात विभाग प्रमुखांचे एक दिवशीय प्रशिक्षण घेण्यात आले.
जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी व निवासी उपजिल्हाधिकारी शैलेष हिंगे  यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हय़ातील सर्व विभागप्रमुखांची भूमिका व  जबाबदार्‍या या विषयावर  मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी आ पत्ती व्यवस्थापन केंद्र, यशदा पुणेचे संचालक कर्नल सुपनेकर  मार्गदर्शक म्हणून होते.  ते म्हणाले की आपत्ती व्यवस्थापन  अधिनियम २00५ नुसार प्रत्येक विभागाने आपल्या विभागाचा  संबंधित आपत्तीनिहाय आराखडा तयार करणे बंधनकारक आहे.  त्यामुळे प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून  सादर करावा तसेच याकरिता वार्षिक अंदाजपत्रकात राज्य पातळी पासून तालुका पातळीपर्यंत तरतूद करावी, अशा सूचना दिल्या. गर्दीचे  व्यवस्थापन विविध अंगांनी करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये इ ितहासातील घटना, सौम्यीकरण, साधन सामग्री, सिद्धता पूर्वसूचना  प्रतिसाद आराखडा क्षमता बांधणी, जिल्हा व तालुका स्तरावर शोध व  बचाव पथके अहवालीकरण या अनुषंगाने तयारी असणे गजरेचे  आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम  २00५ ची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून सर्वांना देण्यात  आली. निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे म्हणाले की जिल्हय़ात  मुख्यत्वे करून लोणी, डव्हा, पोहरादेवी या ठिकाणी मोठय़.ा यात्रा भर तात. या यात्रेत गर्दीचे व्यवस्थापन दरवर्षी करण्यात येते. सद्यस्थितीत  मान्सून कालावधी लक्षात घेता व वर्षभर जिल्हय़ातील विविध आ पत्तीचा मुकाबला करताना विविध विभागाचा समन्वय असणे गरजेचे  आहे, असे हिंगे म्हणाले. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  अधिकारी बालासाहेब बोराडे यांनी वाशिम जिल्हय़ातील विविध आ पत्तीचा व त्यावर उपायांची माहिती प्रास्ताविकातून दिली. 
सदरील प्रशिक्षणास जिल्हा शल्य चिकीत्सक नसरुदीन पटेल, उ पजिल्हाधिकारी सुनिल कोरडे, उपविभागीय अधिकारी शरद जावळे,  सर्व तहसिलदार, मजिप्राचे कार्यकारी अभियंता के.के. जिवणे  यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमख उपस्थित होते. 
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत देशपांडे, अशांत कोकाटे,  शिवाजी जावळे, माधव गोरे, विशाल हिंगमिरे, अनिल वाघ, सर्व  साधन व्यक्तींनी परिo्रम घेतले. 

१९ ऑगस्टला रंगीत तालीम
६0 शाळांच्या आराखड्याची मान्यवरांनी पाहणी केली. यावेळी प्र ितनिधीक स्वरुपात मालेगाव, कारंजा व वाशिम या तालुक्यातील प्र त्येक एक याप्रमाणे तीन आराखड्याचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते  करण्यात आले. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १0.३0 ते ११.३0 या  वेळेत निवडलेल्या शाळेत रंगीत तालीम होणार आहे.

Web Title: Department of Disaster Management Lessons!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.