वाशिम जिल्ह्यातील ‘त्या’ निलंबित ग्रामसेवकांची होणार खातेनिहाय चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 05:46 PM2019-02-06T17:46:10+5:302019-02-06T17:46:16+5:30

दोन्ही ग्रामसेवकांची खातेनिहाय चौकशी होणार असून आरोप प्रपत्र १ ते ४ ची माहिती तत्काळ सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी संबंधित गटविकास अधिकाºयांना दिल्या आहेत.

departmental inquiry of suspended Gramsevaks in Washim | वाशिम जिल्ह्यातील ‘त्या’ निलंबित ग्रामसेवकांची होणार खातेनिहाय चौकशी

वाशिम जिल्ह्यातील ‘त्या’ निलंबित ग्रामसेवकांची होणार खातेनिहाय चौकशी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आर्थिक गैरव्यवहार करणे आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी मारसूळ (ता.मालेगाव) व दापुरी खुर्द (ता.रिसोड) येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना ४ फेब्रुवारीला निलंबित केले. दरम्यान, संबंधित दोन्ही ग्रामसेवकांची खातेनिहाय चौकशी होणार असून आरोप प्रपत्र १ ते ४ ची माहिती तत्काळ सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी संबंधित गटविकास अधिकाºयांना दिल्या आहेत.
१४ व्या वित्त आयोगांतर्गत मिळालेल्या निधीतून अंगणवाडी दुरुस्ती, शौचालय दुरुस्ती, शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली मारसूळ येथील सरपंच, सचिवांनी लाखो रुपयांच्या निधीची अफरातफर केली. 
५ लाख ४२ हजार ५०० रुपयांच्या रक्कमा स्वत:च्या नावे काढल्या. असे आरोप ठेवत ग्रामसेवक दिलीप वाहोकार यांना निलंबित करण्यात आले; तर दापूरी खुर्द (ता.रिसोड) येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक देवराव भगवान बोरकर यांनीही २ लाखांपेक्षा अधिक रक्कमेचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून त्यांनाही निलंबित करण्यात आले. दरम्यान, या दोन्ही ग्रामसेवकांची खातेनिहाय चौकशी केली जाणार असून संबंधित गटविकास अधिकाºयांनी आरोप प्रपत्र १ ते ४ तत्काळ सादर करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिल्या आहेत. या घटनांमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

Web Title: departmental inquiry of suspended Gramsevaks in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम