थकबाकीदार ग्राहकांचा होणार वीजपुुरवठा खंडित !
By admin | Published: May 24, 2017 07:42 PM2017-05-24T19:42:06+5:302017-05-24T19:42:06+5:30
वाशिम - महावितरणच्या वाशिम मंडळातील सहा उपविभागांमध्ये ९४ हजार ६४४ ग्राहकांकडे १४ कोटी ७५ लाख ५७ हजार रुपये इतकी थकबाकी प्रलंबित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - महावितरणच्या वाशिम मंडळातील सहा उपविभागांमध्ये ९४ हजार ६४४ ग्राहकांकडे १४ कोटी ७५ लाख ५७ हजार रुपये इतकी थकबाकी प्रलंबित आहे. तातडीने थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा लवकरच खंडित केला जाणार आहे, असा इशारा महावितरणने दिला.
घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक या वर्गवारीतील ग्राहकांकडे वाशिम मंडळामध्ये असलेल्या सहा उपविभागामध्ये एकूण ९४ हजार ६४४ ग्राहकांकडे १४ कोटी ७५ लाख ५७ हजार रुपये इतकी थकबाकी प्रलंबित आहे. यामध्ये कारंजा उपविभागात १९ हजार ७४४ ग्राहकांकडे २ कोटी ८२ लाख ७३ हजार, मालेगाव उपविभागात १६ हजार ९८७ ग्राहकांकडे ३ कोटी १८ लाख ४२ हजार, मंगरूळपीर उपविभागात १४ हजार ७६७ ग्राहकांकडे १ कोटी ८२ लाख ११ हजार, मानोरा उपविभागात ९ हजार १३० ग्राहकांकडे १ कोटी २० लाख ८६ हजार, रिसोड उपविभागात १५ हजार १४४ ग्राहकांकडे१ कोटी ९० लाख ९६ हजार तर वाशिम उपविभागात १८ हजार ८७२ ग्राहकांकडे ३ कोटी ८० लाख ४६ हजार एवढी थकबाकी प्रलंबित आहे. महावितरणने थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध जोरदार मोहिम उघडली असून त्यामुळे नियमानुसार थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना विजेपासून वंचित राहावे लागू शकते. थकबाकीदार ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असे महावितरणने स्पष्ट केले.