मंगरुळपीर येथे वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:27 AM2021-06-22T04:27:41+5:302021-06-22T04:27:41+5:30

मंगरुळपीर : मंगरुळपीर येथे नगराध्यक्ष डॉ. गजाला खान यांच्या नेतृत्वात सोमवारी वंचित बहुजन आघाडीकडून महागाई विरोधात तहसील कार्यालयासमोर आंदोलन ...

Deprived Bahujan Aghadi movement at Mangrulpeer | मंगरुळपीर येथे वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

मंगरुळपीर येथे वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

Next

मंगरुळपीर : मंगरुळपीर येथे नगराध्यक्ष डॉ. गजाला खान यांच्या नेतृत्वात सोमवारी वंचित बहुजन आघाडीकडून महागाई विरोधात तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

कोविड-१९ च्या महामारीमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला. कष्टकरी, हातावर पोट असणारे व रोजंदारी करणाऱ्या जनतेचे गेली सव्वा वर्षे अतोनात हाल झाले आहे. अशी परिस्थिती असताना केंद्र सरकारने व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल,गॅस,खाद्य तेल दाल व इतर लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू महाग केलेल्या आहेत. शासनाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी जीवनावश्यक वस्तू स्वस्त कराव्यात व जनतेस दिलासा द्यावा, अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे वतीने वंचित बहुजन महिला राज्य आघाडीच्या उपाध्यक्षा डॉ गजाला खान यांनी दिला. यावेळी वाशिम जिल्हा सचिव शंकर तायडे. जिल्हा उपाध्यक्ष समाधानजी भगत , मा. ता. युवा अध्यक्ष राष्ट्रपाल इंगळे, जिल्हा सचिव किसनराव कटके, ॲड .मारुख खान, जिल्हा नेते गोपालराव सुर्वे, गोपाल भाऊ मनवर, जगदीश दंदे, जनार्दन बेलखेडे,राजेश भगत, सर्कल अध्यक्ष. भगवानराव भगत, शालीग्राम चुबळे ,देविदास इंगोले, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुशिला खांडे, पुष्पाताई खंडारे, विठ्ठलराव खाडे, आदी उपस्थित होते.

Web Title: Deprived Bahujan Aghadi movement at Mangrulpeer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.