वंचित बहुजन आघाडीचे महागाई विरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:27 AM2021-06-22T04:27:37+5:302021-06-22T04:27:37+5:30
केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात प्रचंड महागाई वाढली आहे. महागाईमुळे शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, लघु व्यावसायिक यांच्यासमोर ...
केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात प्रचंड महागाई वाढली आहे. महागाईमुळे शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, लघु व्यावसायिक यांच्यासमोर संकट उभे राहले आहे. कोरोना संकटामुळे आधीच जगण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या सामान्य माणसाला महागाईमुळे उपासमारीची पाळी आली आहे. महागाई रोखण्यासाठी शासनाकडे कोणतीही धोरणात्मक भूमिका नाही. महागाईच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठीच २१ जूनला संपूर्ण राज्यभर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. रिसोड तालुक्यातील आंदोलनाला कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रतिसाद देत शासनाविरोधी घोषणा दिल्या व तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देऊन शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. या प्रसंगी तालुका अध्यक्ष सय्यद अकिल, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.रंगनाथ धांडे, गिरीधर शेजुळ, जिल्हा सल्लागार रवींद्र मोरे पाटील, जिल्हा सचिव विश्वनाथ पारडे, युवा नेते अनिल गरकळ, शहराध्यक्ष प्रदीप खंदारे,अर्जुन डोंगरदिवे, रवि अंभोरे, ॲड. तुरूकमाने, ॲड. दशरथ मोरे, रवी तिडके, शालिकराम पठाडे, राहुल जुमडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.