कारवाई होऊनही नागरिक गाफीलच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:42 AM2021-04-04T04:42:30+5:302021-04-04T04:42:30+5:30

वाशिम : कोरोनाचा संसर्ग कायम असतानादेखील बहुतांश नागरिक शहरात मास्कचा वापर न करता बिनधास्त फिरताना दिसून येत आहेत. पोलिसांची ...

Despite the action, the citizens are unaware | कारवाई होऊनही नागरिक गाफीलच

कारवाई होऊनही नागरिक गाफीलच

Next

वाशिम : कोरोनाचा संसर्ग कायम असतानादेखील बहुतांश नागरिक शहरात मास्कचा वापर न करता बिनधास्त फिरताना दिसून येत आहेत. पोलिसांची कारवाईही व्यर्थ ठरत असल्याचे यावरून दिसून येत आहे.

गरोदर माता तपासणी शिबिर

पोहरादेवी : वाईगौळ येथे गर्भवती महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या तपासणीसाठी आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्याम जाधव आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश जाधव यांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

चाैसाळा रस्त्याची दुरवस्था

मानोरा : तालुक्यातील जनुना ते चौसाळा हा आठ किमी अंतराचा रस्ता गेल्या वर्षभरापूर्वी तयार करण्यात आला; परंतु रस्त्याची आता चाळण झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणेही कठीण झाले आहे.

रस्त्याच्या कडा भरण्याची मागणी

अनसिंग : वाशिम सिव्हिल लाईन परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा स्त्री रुग्णालय या रस्त्यावरील सामाजिक न्यायभवनानजीक रस्त्याची बाजू खोलगट झाली आहे. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना गैरसोय होते. रस्त्याच्या कडा भरण्याची मागणी वाहनचालकांनी २ एप्रिल रोजी नगर परिषदेकडे केली.

संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन

वाशिम : युवक-युवतींना रोजगार तथा स्वयंरोजगाराची तसेच कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून महास्वयंम हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. युवक, युवतींनी या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राने शुक्रवारी केले.

वीजपुरवठा खंडित; पाणीपुरवठा प्रभावित

जऊळका रेल्वे : जऊळका रेल्वे जिल्हा परिषद गटात सलग वीजपुरवठा राहत नाही तसेच पुरेशा दाबात वीजपुरवठा होत नसल्याने पाणी पुरवठा योजनेंतर्गतचा जलकुंभ भरण्यास विलंब लागतो. परिणामी, पाणीपुरवठाही प्रभावित होत असल्याचे दिसून येते. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देऊन पुरेशा दाबात वीजपुरवठा करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी गुरूवारी केली.

धानोरा - कुंभी रस्त्याची दुरवस्था

मंगरुळपीर : मंगरूळपीर ते अनसिंग या मुख्य मार्गादरम्यान धानोरा ते कुंभीपर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे चालकांना वाहन चालविताना अडचणी येत असून, एखादवेळी अपघात घडण्याची भीती आहे. याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी संबधितांना कल्पनाही दिली; परंतु दुर्लक्ष केले जात आहे.

रोहित्राअभावी सिंचनात व्यत्यय

अनसिंग : यंदा प्रकल्प, धरणांमध्ये बऱ्यापैकी जलसाठा आहे; परंतु विद्युत रोहित्र नादुरुस्त असल्याने आणि बदलून मिळण्यास १०-१० दिवसांचा कालावधी लागत असल्याने सिंचनात व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी केल्या जात आहे.

धनज परिसरात आरोग्य तपासणी

धनज बु. : जिल्हा परिषद सर्कलमधील धनज बु., धनज खु., लाडेगाव, रहाटी, मेहा, लाडेगावसह परिसरात कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तालुका आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

Web Title: Despite the action, the citizens are unaware

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.