चांगल्या पावसानंतरही अमरावती विभागात हरभऱ्याच्या क्षेत्रात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 01:57 PM2019-01-04T13:57:10+5:302019-01-04T13:57:12+5:30
वाशिम: अमरावती विभागात यंदा समाधानकारक पाऊस पडला असला तरी, गतवर्षीच्या तुलनेत यंदा हरभरा पिकाचे क्षेत्र घटले आहे.
वाशिम: अमरावती विभागात यंदा समाधानकारक पाऊस पडला असला तरी, गतवर्षीच्या तुलनेत यंदा हरभरा पिकाचे क्षेत्र घटले आहे. तथापि, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात मात्र या पिकाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. अद्याप रब्बीची पेरणी सुरू असली तरी, हरभºयाच्या पेरण्या आटोपल्या असल्याने या पिकाच्या क्षेत्रात फारसी वाढ होण्याची शक्यता उरली नाही.
गत तीन वर्षांच्या तुलनेत यंदा बुलडाणा जिल्हा वगळता अमरावती विभागात समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे जलप्रकल्प तुडूंब भरले आणि शेतकºयांना सिंचनाची सोय झाली. साहजिकच यामुळे रब्बीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली होती. प्रत्यक्षात पाऊस चांगला पडूनही रब्बीचे क्षेत्र घटल्याचे विभागस्तरावरील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. रब्बी पिक पेरणीच्या ३ जानेवारी रोजीच्या अहवालानुसार अमरावती विभागात ५१८३४२ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात हरभरा पिकाचे क्षेत्र सर्वाधिक असले तरी वाशिम आणि यवतमाळ वगळता गतवर्षीच्या तुलनेत इतर जिल्ह्यात या पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. गतवर्षी बुलडाणा जिल्ह्यात १३२२४६ हेक्टर क्षेत्रावर हरभºयाची पेरणी झाली होती, तर यंदा ३ जानेवारीपर्यंत केवळ ९५९१६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली, अकोला जिल्ह्यात गतवर्षी ७५३३६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, तर यंदा केवळ ५३३६२ हेक्टरवर पेरणी झाली. अमरावती जिल्ह्यात गतवर्षी १०३९१२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, तर यंदा केवळ ८७३४३ हेक्टर क्षेत्रावर हरभºयाची पेरणी झाली आहे. वाशिम जिल्ह्यात गतवर्षी केवळ ४९५८४ हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरणी झाली होती, तर यंदा त्यात जवळपास २० हजार हेक्टरने वाढ होऊन हरभºयाचे क्षेत्र ७०२०८ हेक्टर झाले आहे. त्याशिवाय यवतमाळ जिल्ह्यात गतवर्षी ९४१४० हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरणी झाली होती, तर यंदा ९९१८० हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. गतवर्षी अमरावती विभागात एकूण ४५५२१८ हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी झाली होती, तर यंदा ३ जानेवारीपर्यंत केवळ ४०६००९ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. आता हरभºयाची पेरणी आटोपत असताना या पिकाच्या क्षेत्रात फारसी वाढ होण्याची शक्यता उरली नाही.