रानडुकरांकडून रब्बी भुईमूग पिकाची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:39 AM2021-05-16T04:39:33+5:302021-05-16T04:39:33+5:30

रामधन हरसिंग राठोड यांच्या सहा एकरात तब्बल अठरा बॅग भुईमुगाच्या बियांची पेरणी केलेली आहे. प्रचंड मेहनत करून व ...

Destruction of rabbi groundnut crop by cows | रानडुकरांकडून रब्बी भुईमूग पिकाची नासाडी

रानडुकरांकडून रब्बी भुईमूग पिकाची नासाडी

Next

रामधन हरसिंग राठोड यांच्या सहा एकरात तब्बल अठरा बॅग भुईमुगाच्या बियांची पेरणी केलेली आहे.

प्रचंड मेहनत करून व पैसे खर्च करून वाढविलेली आणि बऱ्यापैकी भुईमुगाची फलधारणा झालेल्या या पिकाला रानडुकराने मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केले. वन्यप्राण्यांच्या आक्रमणापासून भुईमुगाला वाचविण्यासाठी रामधन राठोड हे शेतकरी आपल्या शेतात रखवाली करीत असताना, मागील तीन आठवड्यांपूर्वी शेतात पावसात भिजल्यामुळे त्यांना न्यूमोनियाने ग्रासले होते. त्यातच कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने प्रारंभी वाशीमला आणि नंतर परिस्थिती गंभीर झाल्याने राठोड हे शेतकरी अकोला येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत होते.

सावरगाव कान्होबा येथे मोठ्या प्रमाणात उन्हाळी भुईमुगाचा पेरा शेतकऱ्यांनी केलेला असून, जंगली प्राण्यांनी या वर्षी असंख्य शेतकऱ्यांच्या भुईमूग पिकाला उद्ध्वस्त केल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. वन विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे.

रामधन राठोड या शेतकऱ्याने आपल्या शेताला लोखंडी तार कुंपण केलेले असूनही, शेतात हजर नसल्याचा फटका वन्य प्राण्याच्या हैदोसामुळे बसला आहे.

वनविभागाने तातडीने या बाधित शेतकऱ्यांच्या शेतीचा पंचनामा करून नियमाप्रमाणे शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याची मागणी सावरगाव कान्होबा येथील भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकरी आजारी असल्यामुळे दोन आठवड्यांतच रानडुकराच्या कळपाने पीक पूर्णपणे उद्ध्वस्त केले.

Web Title: Destruction of rabbi groundnut crop by cows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.