माळरानावर वनराई फुलविण्याचा निर्धार

By admin | Published: June 17, 2017 12:41 AM2017-06-17T00:41:12+5:302017-06-17T00:41:12+5:30

सावली प्रतिष्ठानचा उपक्रम : वृक्षारोपणास प्रारंभ

Determination to cultivate a borer | माळरानावर वनराई फुलविण्याचा निर्धार

माळरानावर वनराई फुलविण्याचा निर्धार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : उन्हाळ्यातील पक्ष्यांसाठी पाणवठे लावतानाच विविध बियांचे संकलन करून माळरान व ओसाड जमिनीवर वृक्षारोपण करण्याला सावली प्रतिष्ठानच्यावतीने प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात आला आहे.
स्थानिक वाशिम येथील निसर्ग व्यासंगी सावली प्रतिष्ठानच्यावतीने भेगाळ आणि वृक्षहीन झालेल्या डोंगराळ माथ्यावर विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. काटा रोड येथील चांदाई माता मंदिर परिसरात, काटा रेल्वे स्थानक पलीकडील घाटमाथ्यावर, मालेगाव तालुक्यातील तपोवन मंदिर परिसरात विविध जातींच्या वृक्षांचे रोपण सावली प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले. वन विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी नांदूरकर, वनरक्षक अश्विनी मोठघरे, निखिल गोरे, अक्षय खंडारे व पक्षीनिरीक्षक मिलिंद सावदेकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे. या कार्यक्रमात सावली प्रतिष्ठानसह मारवाडी युवा मंच या निसर्ग व्यासंगी व सेवाभावी संस्थादेखील मदत करणार आहेत. वृक्षारोपण उपक्रमात प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम धनगर, वैभव गौरकर, बंडू गव्हाणे, विकेश डोंगरे, रुपेश काबरा, रोहिदास धनगर, सुनील हेंद्रे, ऋषीकेश बाभणे, अजय यादव, रुपाली धनगर, रेशमी मोहटे, प्रिया मोरे, वैशाली हांबरे, ृरूशाली बाभने, संगीता धनगर, निखिल मोहटे आदी सावली प्रतिष्ठानच्या सदस्यासह, निखिल गोरे, अक्षय खंडातीरे, पक्षीमित्र मिलिंद सावदेकर, वनपरीक्षेत्र अधिकारी, नांदूरकर, शीरपुटी बीटच्या वनरक्षक अश्विनी मोठघरेसह मासला येथील रा.प. कर्मचारी विठ्ठल संपत धनगर, अरुण धनगर, अशोक धनगर तसेच पांगरी कुटे येथील नंदकिशोर राठोड यांनी परिश्रम घेतले.
--

Web Title: Determination to cultivate a borer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.