शहर विकासाला चालना नाही; पालिका प्रशासनाविरूद्ध वाशिमकरांचे ‘धूळ फेक’ आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 03:06 PM2018-01-17T15:06:25+5:302018-01-17T15:07:46+5:30

वाशिम: शहरा तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून भुमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. कामाची गती अत्यंत संथ असल्याने याविरूद्ध संतप्त शहरवासीयांनी नगर परिषदेवर बुधवार, १७ जानेवारीला ‘धूळ फेक’ आंदोलन केले.

The development of the city is not triggered; Washimkar's agitation | शहर विकासाला चालना नाही; पालिका प्रशासनाविरूद्ध वाशिमकरांचे ‘धूळ फेक’ आंदोलन!

शहर विकासाला चालना नाही; पालिका प्रशासनाविरूद्ध वाशिमकरांचे ‘धूळ फेक’ आंदोलन!

Next
ठळक मुद्देशासनस्तरावरून शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. विकासाला हवी तशी चालना अद्याप मिळाली नसून शहरांतर्गत रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. नगर परिषदेच्या या गलथान कारभारामुळे नागरिकही कमालीचे वैतागले आहेत. 


वाशिम: शहरा तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून भुमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. या कामाची मुदत दोनवेळा संपून लक्ष्मी  सिव्हील इंजिनिअरींग सर्व्हीसेस, प्रा.लि. कोल्हापूर या कंपनीला मुदतवाढ देणयात आली. त्याऊपरही कामाची गती अत्यंत संथ असल्याने याविरूद्ध संतप्त शहरवासीयांनी नगर परिषदेवर बुधवार, १७ जानेवारीला ‘धूळ फेक’ आंदोलन केले.
शासनस्तरावरून शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. मात्र, विकासाला हवी तशी चालना अद्याप मिळाली नसून शहरांतर्गत रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. पाणीपुरवठ्यासाठी योग्यरित्या जलवाहिनी न टाकता आधी रस्त्याचे काम उरकले जात आहे. त्यामुळे जलवाहिनीच्या कामादरम्यान पुन्हा रस्ता फोडावा लागणार आहे. नगर परिषदेच्या या गलथान कारभारामुळे नागरिकही कमालीचे वैतागले आहेत. 
भूमिगत  गटार योजनेच्याा कामातील हलगर्जीपणामुळे शहरात ठिकठिकाणी धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे विशेषत: लहान मुले व वृद्ध नागरिकांना श्वसनांच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यास सर्वस्वी नगर परिषद प्रशासनच जबाबदार आहे. दरम्यान, या सर्व गंभीर प्रकारांची तत्काळ दखल घेवून नागरिकांना दिलासा द्या; अन्यथा नागरी रोष बळावल्याशिवाय राहणार नाही, असे निवेदनात नमूद आहे. निवेदन देताना शहरातील नागरिक, युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बैलबंडीद्वारे  प्रचार ठरला लक्ष्यवेधी!
शहरातील नागरिकांनी नगर परिषदेवर धडक देताना भुमिगत गटार योजनेविषयी संताप दर्शविणारा प्रचार केला. त्याचे फलक बैलबंडीवर लावून ही बैलबंडी थेट नगर परिषदेच्या आवारात घुसविण्यात आली. त्याठिकाणी उपस्थित अधिकाºयांकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. हा प्रकार लक्ष्यवेधी ठरला.

Web Title: The development of the city is not triggered; Washimkar's agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.