लोकसहभागातून होणार गावतलावाचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 04:32 PM2018-06-26T16:32:10+5:302018-06-26T16:34:41+5:30

वाशिम: मंगरुळपीर येथील गावतलावात पावसाचे अधिकाधिक पाणी साठविण्यासाठी लोकसहभागातून कामे करण्यात येत आहेत.

Development of lake from people's participation | लोकसहभागातून होणार गावतलावाचा विकास

लोकसहभागातून होणार गावतलावाचा विकास

Next
ठळक मुद्देमंगरुळपीर शहरात मानोरा चौक परिसरात प्राचीन गाव तलाव आहे.काही वर्षापूर्वी बुजलेला हा तलाव दोन वर्षांपूर्वी आर्ट आॅफ लिव्हिंगच्या पुढाकारातून पुनरुजिव्वीत करण्यात आला. वाहून येणारे लाखो लीटर पाणी या तलावात साठविण्यासाठी इनलेटचे काम करण्यात येणार आहे.

वाशिम: मंगरुळपीर येथील गावतलावात पावसाचे अधिकाधिक पाणी साठविण्यासाठी लोकसहभागातून कामे करण्यात येत आहेत. यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे यांनी नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेतली असून, आता या तलावात वाहते पाणी सोडण्यासाठी इनलेटचे काम करण्यात येत आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आर्थिक योगदान देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मंगरुळपीर शहरात मानोरा चौक परिसरात प्राचीन गाव तलाव आहे. या गावतलावातील साठ्यामुळे शहराची भूजलपातळी वाढण्यास मदत होते. गेल्या काही वर्षापूर्वी बुजलेला हा तलाव दोन वर्षांपूर्वी आर्ट आॅफ लिव्हिंगच्या पुढाकारातून पुनरुजिव्वीत करण्यात आला; परंतु या गतवर्षीच्या अपुºया पावसासह वाहून जाणारे पाणी साठविण्याची व्यवस्था नसल्याने हा तलाव कोरडा पडला होता. या तलावाच्या विकासाची आणि त्यात जलसाठा वाढविण्याची गरज लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते गौरवकुमार इंगळे यांनी याबाबत तालुका व जिल्हास्तरावर पाठपुरावा करून या तलावासाठी लोकसहभागातून इनलेटची व्यवस्था करण्याची परवानगी मिळविली. नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने ही परवानगी दिल्यानंतर आता. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात वाहून येणारे लाखो लीटर पाणी या तलावात साठविण्यासाठी इनलेटचे काम करण्यात येणार आहे. हे काम लोकवर्गणीतून करण्यात येणार असून, जि. प. उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव गावंडे यांनी यासाठी देणगीही दिली आहे. आता सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन या तलावासाठी झटणाºया समाजसेवकांनी केले आहे.

Web Title: Development of lake from people's participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.