विषयाचा विकास हेच राज्यशास्त्र परिषदेचे ध्येय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:38 AM2021-03-28T04:38:52+5:302021-03-28T04:38:52+5:30
राज्यशास्त्र कनिष्ठ महापरिषद महाराष्ट्र यांची ऑनलाइन जिल्हा कार्यकारिणी सहविचार सभा घेण्यात आली त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी त्यांनी ...
राज्यशास्त्र कनिष्ठ महापरिषद महाराष्ट्र यांची ऑनलाइन जिल्हा कार्यकारिणी सहविचार सभा घेण्यात आली त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी त्यांनी राज्यशास्त्र परिषदेचा उद्देश, हेतू आणि भूमिका स्पष्ट केली. सभेच्या राज्याध्यक्षपदी सुमित पवार होते, प्रमुख पाहुणे म्हणू राज्य कार्यकारिणीचे प्रा. सुरेश नारायणे. प्रा. शरद जोशी, प्रा. डाॅ. पितांबर उरकुडे, प्रा. भगवान चौधरी, प्रा.स्मिता जयकर, प्रा. सुनील राठोड, प्रा. जयश्री कळसकर, प्रा.डाॅ. ज्योती गावंडे, प्रा. धनंजय किंबहुणे आदी मान्यवर उपस्थित होते. ऑनलाइन सभेला प्रमुख उपस्थितांमध्ये विभागीय अध्यक्ष प्रा. मनोज जाधव, प्रा.संजय वाहूरवाघ, प्रा. वामण खंदारे व विभागीय सचिव व वाशीम जिल्हा पालक प्रा. दत्तात्रय शिंदे होते. प्रास्ताविक प्रा. मनोज वाघ यांनी, तर कार्यकारिणीचा परिचय जिल्हाध्यक्ष प्रा.कृष्णा खोडे यांनी करून दिला. यावेळी राज्यशास्त्राचे प्रा. सुरेश नारायणे, प्रा. डाॅ. पितांबर उरकुडे, प्रा.भगवान चौधरी यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. या ऑनलाईन सभेला वाशिम जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन प्रा.संतोष दवंडे यांनी केले. आभार प्रा.अनिल बोंडे यांनी मानले.