मेडशी येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांचा ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:42 AM2021-09-19T04:42:29+5:302021-09-19T04:42:29+5:30

मेडशी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचा प्राचीन इतिहास आहे. माजी जि प अध्यक्ष मुकुंदराव मेडशीकर यांचे पणजोबा स्व. मुकुंदराव बाबूराव ...

Devotees flock to Siddhivinayaka's darshan at Medashi | मेडशी येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांचा ओढा

मेडशी येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांचा ओढा

Next

मेडशी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचा प्राचीन इतिहास आहे. माजी जि प अध्यक्ष मुकुंदराव मेडशीकर यांचे पणजोबा स्व. मुकुंदराव बाबूराव मेडशीकर यांना त्यांच्या वाड्याच्या बांधकामाचा पाया खोदताना गणपती बाप्पा, नागधारी श्री विष्णू. शिवलिंग व नंदीच्या मूर्ती आढळून आल्या होत्या. या मूर्ती किती काळापासून त्या भूगर्भात होत्या त्याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. तत्कालीन मेडशीचे सरपंच व माजी जि प. अध्यक्ष मुकुंदराव मेडशीकर यांनी सन १९८५ साली त्या मूर्तींची विधिवत स्थापना करून मंदिर उभारणीचे कार्य केले या मंदिराला सन २०१३ मध्ये तत्कालीन महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री स्व. सुभाषराव झनक यांनी ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र संस्थानचा दर्जा प्रदान करून दिला. या मंदिरात गणेशोत्सवानिमित्त भाविकांचा दर्शनासाठी ओढा दिसत आहे.

Web Title: Devotees flock to Siddhivinayaka's darshan at Medashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.