भर जहागिर येथे वीज देयक वसुलीची धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:28 AM2021-07-15T04:28:19+5:302021-07-15T04:28:19+5:30

रिसोड वीज वितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता हरीष गिऱ्हे, लाईनमन नीलेश देशमुख,संदीप मुंढे, प्रकाश मोरे, सचिन कड, विजय सांगळे यांच्या ...

Dhadak campaign for recovery of electricity bill at Bhar Jahagir | भर जहागिर येथे वीज देयक वसुलीची धडक मोहीम

भर जहागिर येथे वीज देयक वसुलीची धडक मोहीम

Next

रिसोड वीज वितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता हरीष गिऱ्हे, लाईनमन नीलेश देशमुख,संदीप मुंढे, प्रकाश मोरे, सचिन कड, विजय सांगळे यांच्या ईतर काही कर्मचारी यांनी भर जहागीर येथे १२ जुलै रोजी अवैध वीज जोडणी, आकडे,मीटर बंद करून वीज चोरीसह वीज देयके थकीतची वसुली करण्यासाठी धडक मोहीम राबविली. या दरम्यान वीज ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करीत एक लाख दोन हजार रुपयांचा तत्काळ वीज देयकांचा भरणा केला. यामध्ये १२८९० रुपयांची देयके ग्राहकांनी आपल्या मोबाइलद्वारे ऑनलाइन भरले. यावेळी अवैध वीज जोडणी तोडत अनेकांनी टाकलेल्या आकड्यांच्या केबल जमा करण्यात आल्या. वीज बिल थकीतच्या ग्राहकांचे प्रमाण परिसरामध्ये वाढलेले होते. यासाठी वरिष्ठांच्या माध्यमातून थकीत वीज बिल वसुलीची मोहीम राबवली यावेळी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याचे लाईनमन नीलेश देशमुख यांनी सांगितले.

.....................

ओव्हर लोडने वीज ग्राहक त्रस्त

परिसरामध्ये अनेक ग्राहकांचा अतिरिक्त विजेचा वापर वाढलेला असून हा प्रकार चोरट्या मार्गाने केल्या जातो. अनेक लघु उद्योग हे फक्त नामधारी व्यवसायीकांनी विजेचे मिटर घेतले असुन घरगुती मिटरद्वारेच आपले विविध विजेची उपकरणे चालवित आहे. अशामुळे सतत आपल्या विजेचे देयके भरणारे ग्राहक मात्र रात्री बे रात्री ओव्हरलोडमुळे विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झाले आहे. असल्याने वीज कंपनीने त्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक असल्याची तक्रार सर्वसामान्य ग्राहकांनी केली आहे.

Web Title: Dhadak campaign for recovery of electricity bill at Bhar Jahagir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.