धनज बु. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १७ जणांना कोरोना संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:56 AM2021-02-20T05:56:17+5:302021-02-20T05:56:17+5:30
धनज बु. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३० गावांचा समावेश होतो. या ३० गावांपैकी धनज , नागलवाडी, कामरगाव, राहाटी ...
धनज बु. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३० गावांचा समावेश होतो. या ३० गावांपैकी धनज , नागलवाडी, कामरगाव, राहाटी या गावांत कोरोनारुग्ण आढळल्याने ग्रामस्थांची धास्ती वाढली आहे. धनज बु।। प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आढळलेल्या १७ रुग्णांमागे प्रत्येकी २० व्यक्तींचे स्वॅब आरोग्य यंत्रणेकडून घेणे सुरू आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य यंत्रणेकडून रुग्णामागे आढळणाऱ्या संशयितांची आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. दरम्यान, आरोग्य केंद्राकडून परिसरात कोरोनाविषयी जनजागृती केली जात असून, ग्रामस्थांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर मस्के यांनी केले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील शाळा , महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले आहेत.