धनज बु. येथे पोलिसांसाठी कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:16 AM2021-03-13T05:16:26+5:302021-03-13T05:16:26+5:30
कोरोना संसर्ग नियंत्रणात आरोग्य विभागानंतर महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही कोरोना प्रतिबंधक लस आरोग्य विभागाकडून दिली जात ...
कोरोना संसर्ग नियंत्रणात आरोग्य विभागानंतर महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही कोरोना प्रतिबंधक लस आरोग्य विभागाकडून दिली जात आहे. त्यात फेब्रुवारी महिन्यापासून धनज बु. परिसरात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. त्याशिवाय ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षे वयावरील दुर्धर आजारग्रस्त नागरिकांनाही कोरोना लस देण्यात येत आहे. यात शुक्रवारपर्यंत धनज बु. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत शंभरपेक्षा अधिक नागरिकांसह पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षे वयावरील दुर्धर आजारग्रस्त नागरिकांनी त्वरित कोरोना लस घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर म्हस्के यांनी केले आहे.