धनजचा आठवडी बाजार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:01 AM2021-02-23T05:01:38+5:302021-02-23T05:01:38+5:30

धनज बु.: वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार धनज बु. येथे मंगळवारी भरणारा आठवडी बाजार रद्द करण्यात ...

Dhanaj's weekly market canceled | धनजचा आठवडी बाजार रद्द

धनजचा आठवडी बाजार रद्द

Next

धनज बु.: वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार धनज बु. येथे मंगळवारी भरणारा आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे. ग्रामपंचायतने ग्रामस्थांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.

------------

शेतमाल विक्रीची लगबग

धनज बु.: कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कठोर निर्बंध घालण्यात येत असून, पुन्हा लॉकडाऊनची शक्यता व्यक्त होत असल्याने परिसरातील शेतकरी शेतमाल विक्रीची लगबग करीत आहेत.

------------

कामरगावात पथकाकडून जनजागृती

कामरगाव: कारंजा तालुक्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक होत आहे. ग्रामीण भागातही रुग्ण वाढत असल्याने कामरगाव येथे प्रशासनाने फिरत्या वाहनातून कोरोनाबाबत जनजागृती सुरू केली. त्यात गावक-यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.

-------------

मेहा येथे शेतक-यांना मार्गदर्शन

धनज बु.: ‘विकेल ते पिकेल’ या अभियानांतर्गत कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार मेहा येथील शेतक-यांनी टरबूज पिकाची लागवड केली आहे. या शेतक-यांना पीक व्यवस्थापनाबाबत शनिवारी कृषी विभागाने मार्गदर्शन केले.

----------

ढंगारखेड येथे वाहनांची तपासणी

धनज बु.: कारंजा तालुक्यातील ढंगारखेड येथे जिल्हा सीमेवर पुन्हा चेक पोस्ट सुरू करण्यात आली असून, या ठिकाणी पोलिसांनी वाहनांची तपासणी करून चालक, प्रवाशांची आरोग्य विभागाकडून रविवारी तपासणी करून घेतली.

Web Title: Dhanaj's weekly market canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.