९० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या २२ मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडून ‘क्लीन चिट’!, धनंजय मुंडे यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 01:02 AM2019-08-21T01:02:55+5:302019-08-21T01:03:06+5:30
कधीकाळी आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते, लक्ष्मण ढोबळे या नेतेमंडळीवर भाजपाच्याच नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
कारंजा लाड (वाशिम) : भाजपा सरकारच्या २२ मंत्र्यांनी तब्बल ९० हजार कोटींचा घोटाळा केला आहे. त्याचे पुरावे मुख्यमंत्र्यांकडे सादर करूनही अद्याप कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी ‘क्लीन चिट’ दिली, असा घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. आरोपाबाबत माझ्याकडे सर्व पुरावे असून खुल्या चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी तयार राहावे, असे आव्हानही मुंडे यांनी दिले. कारंजा येथील सभेत ते बोलत होते.
राष्टÑवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे कारंजा येथे २० आॅगस्ट रोजी आगमन झाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी मंत्री अनिल देशमुख, सुभाषराव ठाकरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मध्य प्रदेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये नियुक्ती आणि वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशामधील गैरप्रकार अर्थात ‘व्यापम’ घोटाळ्यात दोषी असलेल्या एका कंपनीला महाराष्ट्रात पदभरतीचे कंत्राट दिल्याचा आरोप करीत या दोषी कंपनीकडून राज्यात पारदर्शक नोकरी भरती कशी होईल, असा प्रश्न मुंडे यांनी वाशिम येथे पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
कधीकाळी आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते, लक्ष्मण ढोबळे या नेतेमंडळीवर भाजपाच्याच नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आता या तिघांनी भाजपात प्रवेश घेताच आरोप थांबले. या नेत्यांनी खरोखरच भ्रष्टाचार केला असेल, तर त्यांचे पितळ भाजपा आता उघडे पाडणार का, असा सवालही त्यांनी केला. महाजनादेश यात्रेत लाखो विहिरी, शेततळे उभारण्यात आल्याचे सांगितले जाते; मात्र ते किती खरे आहे, असा सवाल त्यांनी केला.
व्यापम घोटाळ्यातील कुठल्याही कंपनीस शासनाच्या मेगाभरतीचे कंत्राट देण्यात आलेले नाही. महाराष्ट्रातील मेगाभरती ही पूर्णत: आॅनलाइन आहे आणि त्यात अनियमितता करण्यास कुठलाही वाव नाही. पूर्वीच्या आॅफलाइन भरतीसंदर्भात काही आरोप विधिमंडळात करण्यात आले होते आणि त्यांना उत्तरही देण्यात आले होते. - माधव भंडारी, मुख्य प्रवक्ता, प्रदेश भाजप
९० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या
२२ मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडून ‘क्लीन चिट’!, धनंजय मुंडे यांचा आरोप; ‘व्यापम’मधील कंपनीला दिले कंत्राट