धनगर, बंजारा समाजाच्या आरक्षणाकरिता लढा उभारणार : पडळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:21 AM2021-02-05T09:21:42+5:302021-02-05T09:21:42+5:30
सुरुवातीला माता जगदंबा, संत सेवालाल महाराज, धर्मगुरू डॉ. संत रामराव महाराज, बाबनलाल महाराज, भक्तिधाम येथे ते नतमस्तक झाले. त्यानंतर ...
सुरुवातीला माता जगदंबा, संत सेवालाल महाराज, धर्मगुरू डॉ. संत रामराव महाराज, बाबनलाल महाराज, भक्तिधाम येथे ते नतमस्तक झाले.
त्यानंतर माजी आमदार पाटील यांच्या निवासस्थानी एक छोटेखानी सभा झाली. याप्रसंगी प्रारंभी आ. गोपीचंद पंडळकर यांचा जि.प. सदस्य स्वातीताई अजय पाटील यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच हिंगोली, दिग्रस, कारखेडा येथील समाज बांधवांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आ. गोपीचंद पंडळकर पुढे बोलताना म्हणाले, देशात धनगर, बंजारा समाज मोठ्या प्रमाणात असून त्या समाजाचे विधानसभा, विधान परिषदेत प्रतिनिधित्व कमी प्रमाणात आहे. समाजाला योग्य न्याय देण्यासाठी दोन्ही समाजांनी एकजूट होऊन दोन्ही सभागृहांत प्रतिनिधित्व मिळविण्याची गरज आहे. यावेळी माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनी, मानोरा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी आमदार पडळकर यांनी येणाऱ्या अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावावा, असे याप्रसंगी सांगितले. दरम्यान, महंत सुनील महाराज, जितेंद्र महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबूसिंग नाईक यांनी केले तर शंकर आडे यांनी संचलन करून आभार मानले. यावेळी जि .प .सदस्य उमेश पाटील ठाकरे, तालुका अध्यक्ष ठाकूरसिंग चव्हाण, नीलकंठ पाटील,अजय पाटील, पंढरपूर येथील माहुली हळनवार, शिवदास बिडकर यांची उपस्थिती होती.