शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 06:34 PM2019-08-03T18:34:53+5:302019-08-03T18:35:11+5:30
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाशी संलग्न प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघाने (प्रोटान) ३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जूनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देणे यासह अन्य प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाशी संलग्न प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघाने (प्रोटान) ३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
डीसीपीएस, एनपीएस योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षणाचे पूर्णत: खाजगीकरण थांबवून के.जी. ते पी.जी. पर्यंतचे शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यात यावे व एकूण बजेट पैकी १० टक्के बजेट शिक्षणावर खर्च करण्यात यावे, आरटीई अंतर्गत प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांसाठी ३० विद्यार्थ्यांची अट रद्द करून २० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक या प्रमाणे शिक्षक निश्चिती करतांना वर्ग खोल्यांची अट रद्द करण्यात यावी, माध्यमिक व महाविद्यालयीन दर्जा उंचावण्यासाठी व व्यवस्थापन सुलभतेसाठी तालुकास्तरावर स्वतंत्र शिक्षणाधिकारी कार्यालयाची व्यवस्था करण्यात यावी, वरिष्ठ वेतन श्रेणी व इतर कालबद्ध श्रेणींचा लाभ देताना बंधनकारक केलेली शाळा सिद्धीची अट रद्द करावी, १०० टक्के शाळांना अनुदान देण्यात यावे तसेच विनाअनुदानित शाळांना अनुदान देतांना १० वी च्या १०० टक्के निकालाची अट रद्द करण्यात यावी, शिक्षकांना कोणतीही अशैक्षणिक कामे देऊ नये, शिक्षकेतर कर्मचाºयांची संच मान्यता निश्चित करण्यासाठी इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतची संपूर्ण पटसंख्या गृहीत धरण्यात यावी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांची भरती ही शासकीय यंत्रणेमार्फत केंद्रीय पद्धतीने करावी, संगणक विषयाला शालेय अध्यापनामध्ये तासिका निश्चित करून संगणक शिक्षकांची पूर्णवेळ म्हणून नियुक्ती देण्यात यावी, प्रत्येक शाळेत ग्रंथालय व ग्रंथपालाची पूर्णवेळ नियुक्ती करावी, महात्मा जोतीराव फुले यांचा स्मृतीदिन २८ नोव्हेंबर हा शिक्षकदिन म्हणून जाहीर करावा, शिक्षणाधिकाºयांची रिक्त पदे तात्काळ भरावी यासह प्रलंबित मागण्या निकाली काढण्याची मागणी राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघाशी संलग्न प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी संघाने (प्रोटान) केली. धरणे आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.