स्मार्ट ग्राम योजनेतील अन्यायाविरोधात ढोरखेडा ग्रामस्थांचे ७ फेब्रुवारीला धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 05:21 PM2018-02-06T17:21:33+5:302018-02-06T17:23:29+5:30
शिरपूर जैन: चौकशी करण्याच्या मागणीसाठी त्यांनी ७ फेब्रुवारीला पंचायत समिती मालेगाव येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत गटविकास अधिकाºयांना ६ फेब्रुवारीला निवेदन देण्यात आले आहे.
शिरपूर जैन: शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेत सहभागी होऊनही मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा ग्रामपंचायतकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले, तर सहभाग न होणाऱ्या एकांबा ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. यामुळे ढोरखेडा येथील ग्रामस्थ निराश झाले आहेत. या प्रकाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी त्यांनी ७ फेब्रुवारीला पंचायत समिती मालेगाव येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत गटविकास अधिकाºयांना ६ फेब्रुवारीला निवेदन देण्यात आले आहे.
ढोरखेडा येथील कडूजी मिटकरी व ग्रामस्थांच्या स्वाक्षरीनिशी गटविकास अधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद आहे की, शासनाचया स्मार्ट ग्राम योजनेत मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा ग्रामपंचायतने सहभागी होऊन स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबवून जनजागृतीही केली; परंतु या योजनेच्या पुरस्कारापासून ढोरखेडा गावाला वंचित ठेवण्यात आले, तर मालेगाव तालुक्यातीलच एकांबा या ग्रामपंचायतीने या योजनेत सहभाग घेतला नसतानाही या ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. ही निवड कोणत्या निकषावर करण्यात आली. त्याची चौकशी करून ढोरखेडा ग्रामपंचायतीला न्याय द्यावा, यासाठी ७ फेब्रुवारीला पंचायत समितीसमोर ढोरखेडा येथील ग्रामस्थ एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत. या निवेदनावर कडूजी प्रल्हा मिटकरी, पांडुरंग सावले, प्र. नि. पवार आदिंच्या स्वाक्षºया आहेत. निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार मालेगाव आणि पोलीस निरीक्षक मालेगाव यांना देण्यात आल्या आहेत.