कारंजा तालुक्यातील धोत्रा जहॉगीर ग्रामपंचायतला आयएसओ मांनाकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 03:18 PM2019-02-03T15:18:06+5:302019-02-03T15:18:34+5:30
कारंजा लाड (वाशिम): तालुक्यातील आदर्श गाव धोत्रा जहॉंगीर ग्रामपंचायतला आयएसओ नामांकन प्राप्त झाले आहे. आयएसओ मानांकन प्राप्त करणारी ही तालुक्यातील प्रथम ग्रामपंचायत ठरली आहे.
कारंजा लाड (वाशिम): तालुक्यातील आदर्श गाव धोत्रा जहॉंगीर ग्रामपंचायतला आयएसओ नामांकन प्राप्त झाले आहे. आयएसओ मानांकन प्राप्त करणारी ही तालुक्यातील प्रथम ग्रामपंचायत ठरली आहे.
आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती कृषी विभाग पुणे महाराष्ट्र शासनाचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनात आदर्श गाव धोत्रा जहॉगीरला निर्मल ग्राम पुरस्कार, संत गाडगे बाबा स्वच्छता पुरस्कार, स्मार्ट ग्राम पुरस्कार, आदर्श गाव योजनेचा बहुमान आदि पुरस्कार प्राप्त करण्यासाठी विस्तार अधिकारी पांडुरंग गव्हाळे यांचे प्रयत्न, तसेच गावातील युवकांचे परिश्रम महत्त्वाचे ठरले. त्यांच्याच सहकार्याने ग्रामपंचायतीला आयएसओ नामांकन मिळवून देण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून गावात विविध उपक्रम राबविण्यात आले. या कामासाठी सहायकारी संस्था म्हणून गुरूदेव सेवाश्रम समिती कारंजा यांचे सहकार्य लाभले. आदर्श गाव धोत्रा जॅहागीर येथील गावकरी, पदाधिकारी आणि ग्रामसचिवांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच या ग्रामपंचायतीला आयएसओ नामांकन पुरस्कार प्राप्त झाला, अशी प्रतिक्रिया गटविकास अधिकारी के. आर. तापी व सास संस्थेचे सचिव श्याम सवाई यांनी व्यक्त केली.
सरपंच, उपसरपंच, ग्रा.प. सदस्य, कर्मचारी, संगणक परिचालक, रोजगार सेवक आणि गावकºयांसह आदर्श गाव समितीचे सहकार्य तसेच गटविकास अधिकारी तापी व विस्तार अधिकारी सा. हि. चव्हान, वि.अ. घुगे यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळेच आदर्श गाव धोत्रा जहॉगिर ग्रामपंचायतला आयएसओ मानांकन मिळाले आहे.
-पी.आर.गव्हाळे, ग्रामसेवक