एरंडा येथे डायरियाची लागण

By admin | Published: July 3, 2014 11:41 PM2014-07-03T23:41:52+5:302014-07-04T00:01:52+5:30

गावात १२ जणांना डायरियाचा त्रास सुरु झाला.

Diarrhea infection in Aranda | एरंडा येथे डायरियाची लागण

एरंडा येथे डायरियाची लागण

Next

किन्हीराजा : येथून जवळच असलेल्या एरंडा येथे १ जुलै रोजी सोनु विजय घुगे (वय २९ वर्षे) या महिलेचा मेंदुज्वर रोगाने मृत्यू झाला. त्यामुळे किन्हीराजा प्रा. आरोग्य केंद्राचे कर्मचारी १0 जणांचे पथक २ जुलै रोजी एरंडा येथे आले.त्यांनी घरोघरी आरोग्य तपासणी केली. परंतु ३ जुलै रोजी सकाळी गावात १२ जणांना डायरियाचा त्रास सुरु झाला.
डायरियाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये संगीता गजानन घुगे (वय ३२), मंगला निवास घुगे (वय ३४), वेणु चिंतामण घुगे (वय ७0), चिंतामण किसन घुगे (वय ७५) गौरव निवास घुगे (वय १५), नंदा शिवाजी घुगे (वय ३२), लता मारोती घुगे (वय ३५), प्रयागताई भिवाजी घुगे (वय ६0), सुमित्रा संतोष मुसळे (वय २२),सोनी मारोती घुगे (वय १२), शुभंतु भिवाजी मुसळे (वय२0) व एक ५ वर्षाचा मुलगा अशा एकूण १२ जणांचा समावेश आहे.त्यामुळे त्या १२ रुग्णाना किन्हीराजा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे उपचाराकरिता दाखल केले. काही रुग्णांना गावातच गोळय़ा औषधीचे वाटप करुन परिस्थिती नियंत्रणात आणली असून वाशिम येथे दाखल केलेल्या रुग्णांवर उपचार चालू आहेत.दरम्यान गावातील परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बायस व साथरोग नियंत्रक अधिकारी डॉ.मेहकरकर यांनी एरंडा गावाला भेट देऊन कर्मचारी पथकाला दक्षता घेण्यास सांगितले.

Web Title: Diarrhea infection in Aranda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.