कोरोना रुग्ण असणाऱ्या रुग्णवाहिकेस डिझेल मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:44 AM2021-05-20T04:44:22+5:302021-05-20T04:44:22+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात ‘रिलायन्स बीपी मोबिलिटी’ने विविध उपक्रमांची आखणी करून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात ‘रिलायन्स बीपी मोबिलिटी’ने विविध उपक्रमांची आखणी करून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील पूर्णत: कोरोना रुग्णांच्या सेवेत कार्यान्वित असणाऱ्या रुग्णवाहिकांना दररोज ५० लीटरपर्यंत डिझेल पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यास १९ मेपासून रीतसर सुरुवात करण्यात आली. या वेळी तहसीलदार काळे यांच्यासह नगर पंचायतचे मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे, पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, संजय कुळकर्णी, गजानन चवाळे उपस्थित होते. ही योजना ३० जूनपर्यंत सुरू राहणार असल्याचे संजय कुळकर्णी यांनी सांगितले. १०८ तसेच खाजगी रुग्णवाहिकांसाठी ही सुविधा पुरविण्यात येणार असून, सदर रुग्णवाहिका शासनाने अधिग्रहीत केलेली असण्यासह पूर्णत: कोविड-१९ रुग्णांसाठी उपयोगी येत असल्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पत्र सोबत असणे बंधनकारक करण्यात आले आहे, असे संजय कुळकर्णी यांनी सांगितले.