तुरीवर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 02:10 PM2018-10-15T14:10:54+5:302018-10-15T14:11:39+5:30
वाशिम: आॅगस्टनंतर पावसाची दडी, तसेच परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यानंतर तुरीचे पीक आधीच सुकत असताना आता या पिकावर पाने गुंडाळणाºया अळीचा प्रादूर्भाव होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: आॅगस्टनंतर पावसाची दडी, तसेच परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यानंतर तुरीचे पीक आधीच सुकत असताना आता या पिकावर पाने गुंडाळणाºया अळीचा प्रादूर्भाव होत आहे. त्यामुळे झाडांची वाढ खुंटून उत्पादन घटण्याची भिती निर्माण झाल्याने शेतकरी या किडीवर नियंत्रणासाठी फवारणी करीत आहेत.
जिल्ह्यात यंदा ५९ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी झाली आहे. जून ते जुलैच्या मध्यंतरापर्यंत पावसाची चांगली साथ मिळाल्याने तुरीचे पीक चांगले बहरले; परंतु त्यानंतर पावसाने दडी मारली. नंतर आॅगस्ट महिन्यात आलेल्या जोरदार पावसाचा फायदाही या पिकाला झाला; परंतु त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली आणि परतीचय पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे पाण्याअभावी या पिकाची वाढ खुंटली. पाण्याची सोय असलेले शेतकरी सिंचनाचा आधार घेऊन हे पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर कोरडवाहू शेतीमधील पिकाची स्थिती गंभीर असतानाच या पिकावर आता पाने गुंडाळणाºया अळीचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यामुळे या पिकाचे उत्पादन घटण्याची भिती निर्माण झाली असून, शेतकरी किटकनाशकांची फवारणी करून हे पीक वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.