सोयाबीन अनुदानाच्या वितरणात अडचणी, लाभार्थ्यांच्या याद्यांमध्ये चुका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 03:52 PM2017-11-30T15:52:11+5:302017-11-30T15:52:32+5:30
गत वर्षी १ ऑक्टोबर ते ३० डिसेंबरदरम्यान बाजार समित्यांत सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदानाचे वितरण सुरू झाले आहे; परंतु बाजार समित्यांकडून तयार करण्यात आलेल्या याद्यांत चुका असल्याने आता बँका आणि प्रशासनाची चांगलीच पंचाईत झाली आहे.
वाशिम: गत वर्षी १ ऑक्टोबर ते ३० डिसेंबरदरम्यान बाजार समित्यांत सोयाबीन विकलेल्या शेतकºयांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदानाचे वितरण सुरू झाले आहे; परंतु बाजार समित्यांकडून तयार करण्यात आलेल्या याद्यांत चुका असल्याने आता बँका आणि प्रशासनाची चांगलीच पंचाईत झाली आहे.
जिल्ह्यात ४३ हजारांहून अधिक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाच्या निर्णयानुसार अनुदान मंजूर झाले होते. त्यानुसार १४ कोटी ७९ लाख रुपयांचा निधीही जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्राप्त झाला. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या यादीनुसार शेतकºयांच्या खात्यात अनुदान जमा करण्यासाठी बँका आणि पतसंस्थांकडे धनादेश पाठविण्यात येत आहेत. तथापि, या धनादेशानुसार शेतकऱ्यांचे नाव आणि खाते क्रमांक तपासल्यानंतर तफावत आढळून येत आहे.
जिल्ह्यात गतवर्षी हिंगोली, यवतमाळसह इतरही ठिकाणच्या शेतकºयांनी बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विकले होते. त्या शेतकऱ्यांची नावे वाशिम जिल्ह्याच्या यादीत आली आहेत. तथापि, सदर शेतकऱ्यांचे खाते हे वाशिम जिल्ह्यात नसल्यामुळे अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करणे कठीण होत आहे. आता जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत अशा शेतकºयांची यादी तयार करून त्यांचे अनुदान संबंधित जिल्ह्यातील त्यांच्या बँक खात्यात धनादेशाद्वारे वळते करण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.