स्पेशालिस्ट डॉक्टरांअभावी उपचारात अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:17 AM2021-02-21T05:17:47+5:302021-02-21T05:17:47+5:30
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांत मिळून विविध वर्गांतील डॉक्टरांची ३१ पदे मंजूर आहेत. ...
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांत मिळून विविध वर्गांतील डॉक्टरांची ३१ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ११ पदे रिक्त आहेत. त्यात प्रामुख्याने सोनोग्राफी तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, गायनोकॉलॉजिस्ट आदींचाही समावेश आहे. त्यातच काही नियुक्त केलेले डॉक्टर्स कर्तव्यावर रुजूच झाले नाहीत. त्यामुळे रुग्णांवर योग्य उपचार करण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपूर्वी कंत्राटी पद्धतीने काही पदे भरण्यात आली असून, आयसीयू कक्षात स्पेशालिस्ट डॉक्टर असल्याने या विभागात फारशा अडचणी जाणवत नाहीत.
--------
कोट : जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसीयू स्पेशालिस्टसह इतर आवश्यक तज्ज्ञांची ७ पदे भरली आहेत, तर १३ पदे रिक्त आहेत. उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णांलयात मिळून गायनोकॉलॉजिस्ट आणि सोनोग्राफी तज्ज्ञांसह १४ पदे रिक्त आहेत. येत्या काही दिवसांत त्यांनी एक्स-रे टेक्निशियन आणि सोनोग्राफी तज्ज्ञांची पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणे सोपे होईल.
-डॉ.मधुकर राठोड,
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम
-----------
आयसीयूसाठी स्पेशालिस्ट उपलब्ध
जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांत मिळून स्पेशालिस्ट आणि इतर डॉक्टरांची पदे रिक्त असली, तरी आयसीयू कक्षात आवश्यकतेनुसार स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध आहेत. त्यामुळे या कक्षात दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांवर वेळेत आवश्यक ते सर्व उपचार करणे सोयीचे होत असून, कोरोना संसर्गाच्या काळातच आयसीयूसाठी विविध पदे आणि सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
-
जिल्हा रुग्णालय
उपलब्ध डॉक्टर्स
२०
स्पेशालिस्ट
०७
रिक्त पदे
१३
-
उपजिल्हा रुग्णालय
उपलब्ध डॉक्टर्स
१६
स्पेशालिस्ट
०५
रिक्त पदे
११
----------
जिल्हा सामान्य रुग्णालय
उपलब्ध डॉक्टर्स
१५
स्पेशालिस्ट
०२
रिक्त पदे
०३
--------