दहावी, बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ‘लेखनिक’ची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:56 AM2021-02-25T04:56:13+5:302021-02-25T04:56:13+5:30
जिल्ह्यात विविध स्वरूपातील दिव्यांग असलेल्या दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांची एकूण संख्या १२१९ आहे. त्यात दहावीतील ६४५; तर बारावीच्या ५७४ ...
जिल्ह्यात विविध स्वरूपातील दिव्यांग असलेल्या दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांची एकूण संख्या १२१९ आहे. त्यात दहावीतील ६४५; तर बारावीच्या ५७४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील बहुतांश विद्यार्थी नेत्रहिन, हात, हाताची बोटे अत्यंत कमजोर असणारी आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षा देण्याकरिता ‘लेखनिक’ची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. यावर्षी मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे ही व्यवस्था मिळणे अशक्य असल्याचे दिसत आहे. यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार असून, शासनाने यासंबंधी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.
.................
दिव्यांग परीक्षार्थी
६४५
दहावीतील विद्यार्थी
५७४
बारावीतील विद्यार्थी
..................
पालक काय म्हणतात
माझा मुलगा दहावीत असून, त्याला लिहिता, वाचता येण्यात आधीच अडचणी जातात. अशा स्थितीत परीक्षेच्या वेळी ‘लेखनिक’ मिळणार नसल्यास मोठी समस्या निर्माण होणार आहे. शासनाने यावर प्रभावी पर्याय शोधणे आवश्यक आहे.
- बेबीताई धुळधुळे
...................
कोरोनाच्या संकटाने आता अधिक तीव्रतेने डोके वर काढले आहे. त्यामुळे परीक्षाच व्हायला नको किंवा ऑनलाईन स्वरुपात व्हायला हवी. दिव्यांग मुलांकरिता ‘लेखनिक’ मिळणे तर अत्यावश्यक आहे.
- मनीष डांगे
.......................
माझा मुलगा इयत्ता बारावीमध्ये असून, लवकरच परीक्षा होणार असल्याचे कळले आहे. कोरोनामुळे परीक्षेची पूर्णत: तयारी झालेली नाही. अशातच ‘लेखनिक’ मिळणार नसल्यास मोठी अडचण निर्माण होणार आहे.
- समाधान शिंदे
........................
कोट :
दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही परीक्षा कोरोनाविषयक सुचनांचे पालन करून घेतली जाणार आहे. विशेषत: शारीरिक अंतराच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे. त्यामुळे दिव्यांग परीक्षार्थ्यांना ‘लेखनिक’ मिळणार किंवा नाही, हे सध्यातरी सांगता येणे कठीण आहे.
- रमेश तांगडे, शिक्षणाधिकारी