दिगंबर जैन सोशल गु्रपची राज्यस्तरीय सभा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 07:58 PM2017-10-10T19:58:14+5:302017-10-10T19:59:46+5:30
वाशिम: सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या दिगंबर जैन सोशल ग्रुप फेडरेशनच्यावतीने स्थानिक अकोला नाका येथील जैन भवन येथे आयोजित राज्यस्तरीय सभा सोमवारी उत्साहात पार पडली. या प्रसंगी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यातुन जैन सोश्ल ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क

सभेच्या सुरुवातीला सुखानंद पाटणी यांच्याहस्ते मुख्यव्दाराचे फित कापुन उद्घाटन करण्यात आले, तर धर्मध्वजारोहन कैलासचंद पाटणी यांच्याहस्ते तसेच सभा मंडपाचे उद्घाटन जळगाव येथील प्रदीप जैन यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून मुंबईचे उद्योगपती सुभाशचंद पाटणी, दिगंबर जैन सोशल गु्रप फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हसमुख जैन गांधी, राष्ट्रीय महासचिव राजेंद्र जैन, महाराष्ट्र विभागीय प्रभारी व शपथविधी अधिकारी मनोहर झांजरी, नवीनसेन, महेंद्र काला, सुभाष काला, संयोजक प्रविण पाटणी, विलास पाटणी, वाशिम चे अध्यक्ष हरिष बज, सचिव संजोग छाबडा, विपीन बाकलीवाल, प्रकाशचंद गोधा, श्वेता बडजातीया, रंजिता गोधा, रमेशचंद्र बज, अािद उपस्थित होते. समाजाचे ज्येष्ठ माणिकचंद बज यांच्याहस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी आंबेझर पार्श्वनाथ मंदिर पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत तसेच अकोला येथील श्रृती अजय पाटणी हिने आई या विषयावर नृत्य नाटीका सादर करुन सर्वांची मने जिंकली. शिल्पा सचिन पाटणी याच्या मुलांनी व प्रियंका अनुप बाकलीवाल हिने सांस्कृतीक नाटीकेचे सादरीकरण केले. राष्ट्रीय अध्यक्ष हसमुख गांधी जैन यांनी यांच्याहस्ते फेडरेशनच्या निर्देशिकेचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रवि बज व सुनिता बज यांनी केले व आभार राष्ट्रीय सचिव राजेंद्र जैन इंदोर यांनी मानले. सभेचे प्रास्ताविक हरिष बज यांनी तर संयोजक प्रविण पाटणी यांनी गु्रपच्या कार्याची माहिती विषद केली.