ई-क्लास जमिनीवरील नियमबाह्य खोदकाम ‘रडार’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 02:08 PM2018-12-01T14:08:43+5:302018-12-01T14:09:07+5:30
वाशिम: जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गासाठी लागणारे गौण खनिजाची पूर्तता करताना जलसंधारणाची कामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले असून, जलसंधारण होऊ न शकणाºया ठिकाणी खोदकामास मज्जावही करण्यात आला आहे.
लोेकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गासाठी लागणारे गौण खनिजाची पूर्तता करताना जलसंधारणाची कामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले असून, जलसंधारण होऊ न शकणाºया ठिकाणी खोदकामास मज्जावही करण्यात आला आहे. असे असताना काही ठिकाणी ई-क्लास जमिनीवर नियमबाह्य खोदकाम होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. या पृष्ठभूमीवर प्रशासनाकडून चौकशी करण्यात येत असून, ईक्लास जमिनीवर होत असलेल्या खोदकामावर कारवाई करण्याचे संकेत अधिकाºयांनी दिले आहेत.
वाशिम जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांसाठी मुरूम, गिट्टी, वाळू या गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. राष्ट्रीय महामार्गांसाठी लागणाºया गौण खनिजाची गरज पूर्ण करताना जलसंधारणाची कामेही होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकाºयांनी कंत्राटदार कंपन्यांच्या प्रतिनिधींसह अधिकाºयांची बैठक घेऊन जलसंधारण होऊ शकणाºया स्थळांचे सर्वेक्षण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तथापि, जेथे जलसंधारण होऊ शकत नाही, अशा कुठल्याही ई-क्लास जागेवर खोदकाम करता कामा नये, असे स्पष्ट निर्देशही देण्यात आले आहेत. अद्याप जलसंधारणाच्या कामांसाठी स्थळांचे सर्वेक्षण पूर्ण झाले नाही. तथापि, काही ठिकाणी कंत्राटदार कंपन्यांसह इतर काही लोक ई-क्लास जागेवर खोदकाम करीत असल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या तक्रारीच्या पृष्ठभूमीवर महसूल विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीत ई-क्लास जागेवर नियमबाह्य पद्धतीने खोदकाम होत असल्याचे सिद्ध झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे.