डिजिटल आर्थिक साक्षरता जनजागृती शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:51 AM2021-07-07T04:51:37+5:302021-07-07T04:51:37+5:30
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार तथा संचालक अमित झनक यांची उपस्थिती होती. बँकिंग प्रवाहापासून दूर असलेल्या आर्थिक, दुर्बल घटकातील ...
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार तथा संचालक अमित झनक यांची उपस्थिती होती. बँकिंग प्रवाहापासून दूर असलेल्या आर्थिक, दुर्बल घटकातील लोकांना बँकेच्या मुख्य प्रवाहात आणणे व त्यांना योजनेची माहिती देणे हा उद्देश ठेवून या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार झनक यांनी ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाईन फसवणुकीपासून कसे सावध राहावे, याबाबत माहिती दिली. तसेच बचत गटांना मिळणाऱ्या कर्ज पुरवठ्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मार्केटिंग अधिकारी गायकवाड यांनी बँकेच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. यामध्ये विमा योजना, किसान क्रेडिट कार्ड योजना, मोबाईल बँकिंग यांचा समावेश आहे. या कॅम्पला वडजी, गोभणी, गोंडाळा, लेहणी, नेतंसा, नावली, पेनबोरी येथील शेतकरी, व्यावसायिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेकरिता शाखाधिकारी जाधव, निरीक्षक झनक, कर्मचारी वर्ग साबळे, नवघरे, काळे यांनी नियोजन केले नागरे यांनी आभार मानले.