उत्पन्नाच्या डिजिटल दाखल्याचा प्रयोग यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:43 AM2021-01-13T05:43:54+5:302021-01-13T05:43:54+5:30
या डिजिटल दाखल्याचे वितरण तहसीलदार विजय साळवे यांच्या हस्ते केकतउमरा येथील विठाबाई पसारकर विद्यालयात करण्यात आले. यावेळी तहसीलदार साळवे ...
या डिजिटल दाखल्याचे वितरण तहसीलदार विजय साळवे यांच्या हस्ते केकतउमरा येथील विठाबाई पसारकर विद्यालयात करण्यात आले.
यावेळी तहसीलदार साळवे म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाचा दाखला अत्यावश्यक असतो. अनेकदा हा दाखला वेळेवर मिळत नाही. बाहेरगावी असणाऱ्या विद्यार्थ्यांना या छोट्याशा कामासाठी गावाकडे परत यावे लागते. या नवीन उपक्रमामुळे विद्यार्थी मोबाइलद्वारे तलाठी यांना उत्पन्नाचा दाखला मागण्यासाठी ‘रिक्वेस्ट’ पाठवू शकणार आहेत व तलाठी त्या विद्यार्थ्याला मोबाइलवर डिजिटल स्वाक्षरी असलेला उत्पन्नाचा दाखला पीडीएफ स्वरूपात पाठवू शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ व पैशाची बचत होणार असल्याचे तहसीलदार साळवे म्हणाले. केकतउमरा येथील तलाठी माळेकर यांचा उत्पन्नाच्या डिजिटल दाखल्याचा प्रयोग हा राज्यातील पहिला असल्याचा दावाही यावेळी साळवे यांनी केला. माळेकर यांनी तयार केलेल्या सॉफ्टवेअरबद्दल माहिती दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षा पसारकर व संस्थचे सहसचिव अविनाश पसारकर यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.
०००००
विद्यार्थ्यांसाठी दहा हजारांची पुस्तके
केकतउमरा येथील शाळेतील वाचनालयात विविध स्वरूपातील पुस्तके उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा. भविष्यातील स्पर्धेत टिकण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आतापासून तयार राहावे. आपल्याकडून विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयांची पुस्तके भेट देणार असल्याचे तहसीलदार विजय साळवे यांनी जाहीर केले.