दिलीप फुके नावीन्यपूर्ण पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:18 AM2021-03-04T05:18:15+5:302021-03-04T05:18:15+5:30
दिलिप फुके यांनी बीबीएफ तंत्रज्ञान वापरून व इतर शेतकऱ्यांना या विषयीची माहिती दिली व त्याचा प्रचार ...
दिलिप फुके यांनी बीबीएफ तंत्रज्ञान वापरून व इतर शेतकऱ्यांना या विषयीची माहिती दिली व त्याचा प्रचार प्रसार केला. मृद व जलसंधारणचे चांगल्या प्रकारचे काम करून शेतकऱ्यांच्या शेतावर या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे बीबीएफचे जनक म्हणून फुके यांची पुरस्कारासाठी निवड झाली. केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्या हस्ते फुके यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी सचिव तथा महानिदेशक डॉ. त्रिलोचन माहापात्रा व महानिदेशक डॉ. अशोक कुमार सिंह व निदेशक डॉ. जे. पी. एस. डबास व संचालक डॉ. कुंभारे, डॉ. डी. के. यादव, डॉ. इंद्रमणी मिश्र व भारतीय कृषी अनु संस्थान दिल्ली येथील सर्व शास्त्रज्ञ संशोधक यांची प्रमुख उपस्थिती होती.