वाशिम येथील देवतलावाला घाणीचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 11:16 AM2020-07-17T11:16:01+5:302020-07-17T11:16:16+5:30
शहरातील प्रसिध्द देव तलावाला घाणीच्या विळख्याने वेढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरातील प्रसिध्द देव तलावाला घाणीच्या विळख्याने वेढले असून प्रशासनाच्यावतिने येथील घाण स्वच्छ करण्याची गरज निर्माण झाली आहे. गतवर्षी विविध सामाजिक संघटनांनी मिळून या देवतलावातील गाळ काढून स्वच्छता केली होती. याला प्रशासनाचेही सहकार्य लाभले होते. यावर्षी मात्र याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.
वाशिम शहरातील बालाजी मंदिरानजिक पुरातन देवतलाव आहे. सदर देवतलाव तिरुपती येथे असलेल्या तलावासारखा असून अनेक भाविक बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर या तलावाच्या दर्शनासाठी येतात. देवतलावातील पाणी दूषित होवू नये याासाठी सर्व बाजुने कुंपन भिंत उभारण्यात आली आहे. तरी सुध्दा काही नागरिक येथे कचरा टाकत असल्याने येथे घाण साचली आहे. तसेच काही दुकानांचे सांडपाणी देव तलावात येत असल्याचे दिसून येते. गतवर्षी सामाजिक संघटनांनी मोठा पुढाकार घेवून मोलाचे कार्य केले होते. याहीवर्षी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेवून देवतालावाची स्वच्छतेबाबत पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. सद्यस्थितीत कोरोनामुळे प्रशासनाचे लक्ष कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी होत आहे.
शहरातील पवित्र असलेल्या देवतलावाच्या बाजुला घाण होणार नाही याकरिता सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.