मानोरा शहरात ठिकठिकाणी घाण, कचऱ्याचे ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:26 AM2021-06-27T04:26:27+5:302021-06-27T04:26:27+5:30
मानोरा शहरातील साफसफाईच्या कामाचे कंत्राट दिग्रस येथील एका व्यक्तीला दिले आहे; परंतु त्यांच्याकडून योग्यरीत्या हे काम पार ...
मानोरा शहरातील साफसफाईच्या कामाचे कंत्राट दिग्रस येथील एका व्यक्तीला दिले आहे; परंतु त्यांच्याकडून योग्यरीत्या हे काम पार पाडले जात नाही. शहरातील साफसफाईच्या कामावर सहा महिला आणि पाच पुरुष, तसेच तीन घंटागाड्यांचा वापर करण्यात येत असल्याची माहिती आहे. मात्र त्यांच्याकडून साफसफाईची जबाबदारी नियमितपणे पार पाडली जात नाही, असा आरोप राठोड यांनी केला आहे. शहरातील केवळ स्टेट बँक ते दिग्रस चौक आणि दिग्रस चौक ते भाजी मार्केट एवढ्याच परिसरात सफाई केली जाते. शहरातील इतर भागांतील साफसफाईची तसदी मात्र घेतली जात नाही. नगरपंचायतीच्या प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सर्व प्रभागांत स्वच्छता अभियान राबवून घाण, कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी देवराव राठोड यांनी केली आहे.