पावसाळ्यातही जागाेजागी घाणकचरा; स्वच्छतेकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:46 AM2021-08-21T04:46:15+5:302021-08-21T04:46:15+5:30
नंदकिशोर नारे वाशिम : ऐन पावसाळ्याच्या दिवसात शहरातील पाहिजे त्या प्रमाणात स्वच्छता हाेत नसल्याने, शहरातील अनेक भागात घाण, कचऱ्याचे ...
नंदकिशोर नारे
वाशिम : ऐन पावसाळ्याच्या दिवसात शहरातील पाहिजे त्या प्रमाणात स्वच्छता हाेत नसल्याने, शहरातील अनेक भागात घाण, कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असल्याचे ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीवरून दिसून आले. नगरपरिषदेकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने, नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे.
सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस असल्याने शहर स्वच्छ ठेवून राेगराईला दूर करण्याचे कार्य नगरपरिषदेच्या आराेग्य विभाागाचे आहे, परंतु शहरातील स्वामी समर्थनगर, बिलालानगर, काळे फाइल परिसराची पाहणी केली असता, अनेक ठिकाणी अस्वच्छता दिसून आली. याकडे नगरपरिषदेने लक्ष देण्याची मागणी या भागातील नागरिकांतून केली जात आहे. शहरातील काही रस्त्यावर कचरा आढळून आला.
--------------
अनेक भागातील नाल्या अस्वच्छ
पावसाळ्याच्या दिवसात शहराची स्वच्छता ठेवणे गरजेचे असताना, याकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने, अनेक भागांतील नाल्या स्वच्छ न केल्याने दुर्गंधीचा फैलाव निर्माण झाला आहे. नाल्यांची स्वच्छता नसल्याने घाणपाणी जमा हाेऊन त्यावर मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने, नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. शहरातील अस्वच्छ असलेल्या नाल्या स्वच्छ करून, नागरिकांचे आराेग्य अबाधित ठेवण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
------
बिलालनगरमध्ये रस्त्यावर साचले डबके
वाशिम शहरातील हिंगाेली रस्त्यावर असलेल्या रस्त्यांवर डबके साचल्याने व रस्त्यावर चिखलच चिखल असल्याने, या भागातील नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. बिलालनगरची स्थापना झाली, तेव्हा पक्के रस्ते न बनविण्यात आल्याने पावसाळ्याच्या दिवसात चिखल निर्माण हाेत आहे, तसेच रस्त्यावर पडलेल्या डबक्यांमुळे त्यावर डासांची उत्पती हाेत असल्याने नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. या संदर्भात या भागातील नागरिकांनी संबंधितांना सूचना देऊनही काहीच फायदा झाला नसल्याने, नगरपरिषदविरुद्ध राेष व्यक्त केला जात आहे.
-------
शहरात मान्सूनपूर्व कामे करून, शहराची स्वच्छता करण्यात आली आहे, तसेच दैनंदिन प्रत्येक वार्डातील स्वच्छता करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांनी आपल्या भागातील अडचणी मांडल्यास त्यांना प्राधान्यही देण्यात येत आहे.
दीपक माेरे, मुख्याधिकारी, नगरपरिषद, वाशिम.