वाशिम जिल्हयात १५ ते ३० डिसेंबरदरम्यान दिव्यांग नोंदणी पंधरवडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 03:44 PM2017-12-11T15:44:07+5:302017-12-11T15:45:22+5:30
वाशिम - जिल्हयात येत्या १५ ते ३० डिसेंबर या कालावधीत दिव्यांग नोंदणी पंधरवडा राबविला जाणार आहे. या पंधरवड्यासंदर्भात गावस्तरावर जनजागृती केली जाणार असून, ग्रामपंचायतनिहाय सर्वेक्षण होणार आहे.
वाशिम - जिल्हयात येत्या १५ ते ३० डिसेंबर या कालावधीत दिव्यांग नोंदणी पंधरवडा राबविला जाणार आहे. या पंधरवड्यासंदर्भात गावस्तरावर जनजागृती केली जाणार असून, ग्रामपंचायतनिहाय सर्वेक्षण होणार आहे.
शासन निर्णयानुसार दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीन विकासासाठी ३ टक्के निधी राखीव ठेवला जातो. हा निधी दिव्यांग बांधवाच्या विकासात्मक बाबींवर खर्च व्हावा, दिव्यांग बांधवांची ग्रामपंचायतला नोंदणी व्हावी यासह दिव्यांग बांधवांच्या कल्याणकारी योजनांसंदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून शासन निर्णयानुसार येत्या १५ डिसेंंबर ते ३० डिसेंंबरदरम्यान विशेष मोहिम राबविली जाणार आहे. या पंधरवड्याअंतर्गत दिव्यांग बांधवांचे ग्रामपंचायत निहाय सर्वेक्षण व नावनोंदणी अभियान राबविले जाणार आहे. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी असलेला ३ टक्के राखीव निधी व विविध योजना राबविण्यासंदर्भात या कालावधीत जनजागृती होणे अपेक्षीत आहे. दिव्यांगांना अन्न, वस्त्र, निवारा व स्वयंरोजगार कसा मिळेल याबाबत ठोस कार्यक्रम राबवावा, अशी अपेक्षा दिव्यांग बांधवांमधून व्यक्त होत आहे.