वाशिम जिल्ह्यात दिव्यांगांचा निधी अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 05:23 PM2019-06-22T17:23:02+5:302019-06-22T17:23:29+5:30

वाशिम जिल्ह्यात लाखो रुपयांचा हा निधी अखर्चित आहे. मंगरूळपीर तालुक्यातही सदर निधी योग्य प्रमाणात खर्च करण्यात आला नाही.

Disable scheme fund in Washim district is printed | वाशिम जिल्ह्यात दिव्यांगांचा निधी अखर्चित

वाशिम जिल्ह्यात दिव्यांगांचा निधी अखर्चित

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर (वाशिम) : दिव्यांगांचा लाखो रुपयांचा निधी अखर्चित असून, सदर निधी शासन निर्णयानुसार दिव्यांगाच्या विकासात्मक उपक्रम, योजनांवर खर्च करण्याची मागणी दिव्यांग बेरोजगार संघटनेच्यावतीने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
महाराष्ट्र अपंग हक्क अधिनियम २०१६ नुसार दिव्यांगाच्या विकास कामावर ५ टक्के निधी खर्च करणे बंधनकारक असुन २५ जुन २०१६ च्या सुधारीत शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने दिव्यांगाच्या विकास कार्यावर निधी खर्च करण्याच्या सुचना राज्यातील ग्रामपंचायत, नगर परिषदांना दिल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात लाखो रुपयांचा हा निधी अखर्चित आहे. मंगरूळपीर तालुक्यातही सदर निधी योग्य प्रमाणात खर्च करण्यात आला नाही. ग्राम पंचायत स्तरावर हा निधी योग्य प्रमाणात खर्च होत नसल्याने दिव्यांग बांधवांमधून रोष व्यक्त होत आहे. शासन नियमानुसार सदर निधी खर्च करण्याची मागणी तालुकाध्यक्ष लता गावंडे, गणेश उमाळे, केशव वावगे, प्रल्हाद हिवराळे, सचिन कावरे, गजानन हरणे, विष्णु कावरे, गणेश कातडे, आदींनी केली.

Web Title: Disable scheme fund in Washim district is printed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.