वाशिममध्ये शालेय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 01:36 PM2018-10-13T13:36:54+5:302018-10-13T13:37:13+5:30
वाशिम : संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनुसार राज्य व जिल्हास्तरावर १३ आॅक्टोंबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनुसार राज्य व जिल्हास्तरावर १३ आॅक्टोंबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ११ ते १८ आॅक्टोंबरदरम्यान जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन आठवडा साजरा केला जात असून १३ आॅक्टोंबरला वाशिममधील श्री बाकलीवाल विद्यालयात विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापन आठवडा कालावधीत जिल्ह्यातील शाळांमध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य आदी कार्यक्रम घेण्याचे शासनाचे निर्देश आहेत. यासह मोबाईल व्हॅन, प्रदर्शन, आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम (मॉक ड्रील), सभा, मुद्रित साहित्य, बॅनर, डॉक्युमेंटरी, चित्रफित आदिंच्या माध्यमातूनही जनजागृती आणि शासनाचे आपत्ती व्यवस्थापन धोरण, क्षमता बांधणीचे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. दरम्यान, या उपक्रमांतर्गत वाशिमच्या श्री बाकलीवाल विद्यालयात शनिवारी सकाळी संत गाडगेबाबा आपत्कालिन व शोध पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी पाण्यात बुडून जीव धोक्यात सापडल्यास काय करायला हवे अथवा पाण्यातील मृतदेह शोधण्यासाठी कुठल्या उपाययोजना करता येऊ शकतात, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांची उपस्थिती होती.